bjp leader dhananjay mahadik

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- २६४ मतदारांचे पाठबळ पाठीशी : धनंजय महाडिक

कुरुंदवाडला डांगेंसह नगरसेवकांच्या भेटी

कुरुंदवाड, ता. १४ : विधान परिषद निवडणुकीत २६४ मतदारांचे भक्कम पाठबळ आमच्या पाठीशी असून पालकमंत्री सतेज पाटील यांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे २५२ मतदार आपल्याकडे असल्याची अफवा पालकमंत्री पसरवत असल्याची टीका भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे व नगरसेवकांच्या भेटीसाठी आले असता ते बोलत होते. सुरेश हाळवणकर, जि.प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी शिरोळ तालुक्‍याचा दौरा करून गेल्यानंतर श्री. महाडिक,
हाळवणकर यांनी सायंकाळी येथील नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी नगराध्यक्ष डांगे यांच्याबरोबर श्री. महाडिक यांनी बंद खोलीत चर्चा केली. डांगे यांनी महाडिक यांचेही स्वागत केले. यावेळी नगरसेवक अनुप मधाळे, उदय डांगे, दयानंद मालवेकर, उमेश कर्नाळे आदी उपस्थित होते.

हे हि वाचा 

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- भाजपच्या बैठकीस कोरे, आवाडे हजर

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company