जागर वक्तृत्वाचा या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत उस्मानाबादची आरोही सोन्ने प्रथम

 

“जागर वक्तृत्वाचा या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत उस्मानाबादची आरोही सोन्ने प्रथम”

वैष्णवी पाध्ये/सर्जेराव खाडे

यशवंतराव पाध्ये शैक्षणिक सांस्कृतिक धर्मादाय संस्था गगनबावडा,कोल्हापूर व श्री नंदिकेश्वर मशिनरी इंदापूर पूणे यांच्या संयूक्त विद्यमाने आयोजित जागर वक्तृत्वाचा या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील सोन्नेवाडी गावची आरोही प्रभूकांत सोन्ने हीने प्रथम क्रमांक पटकाविला.
गगनबावड्याच्या वैदेही श्रीकृष्ण पाध्ये यानी या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते,स्पर्धेसाठी अमित भारत लाळगे यांचे विशेष सहकार्य लाभले.या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये राज्यभरातून ५८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
खूल्या गटासाठी आयोजित जागर वक्तृत्वाचा या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सोन्नेवाडीची आठ वर्षाची आरोही सोन्ने ही प्रथम क्रमांकांची मानकरी ठरली तर दुसरा क्रमांक विभागून दिला असून दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी गगनबावडा तालुक्यातील मांडूकली गावचे प्रा.बाबासाहेब कांबळे व बारामतीच्या स्मृतिका ढवाण पाटील या ठरल्या आहेत.
तिसरा क्रमांकही विभागून दिला असून तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या प्रतिक्षा थूटे,हिंगणघाट जि.वर्धा तर श्रेया म्हापसेकर,कोल्हापूर या आहेत.
या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांकाचे विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे ओंकार पिसे,ठाणे,गुंजन मुंडे,हिंगणघाट,ऋतूजा माने तासगाव तर उत्स्फुर्त सहभागातील विजेते स्पर्धक जोत्स्ना ढासाळकर,रविना पवार,दुर्गा मगर,मंगेश महाजन,ज्ञानेश्वरी डफळ हे आहेत.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना फोन पे द्वारे बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे,तर लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर प्रशस्तीपत्र व भेटवस्तूचे वाटप केले जाणार असल्याचे संयोजन समितीने सांगितले.
स्पर्धेचे परिक्षण कार्य संयोजन समितीचे अमित लाळगे,वैष्णवी पाध्ये,इंद्रजित मोरे,संकेत मोरे,ओंकार जाधव,अवधूत गूरव यांनी पार पाडले.