mushrif

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याचं सोमय्यांच्या आरोपांना उत्तर

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

किरीट सोमय्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच मला शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर, हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले, किरीट सोमय्यांचा दावा

मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी त्यांना माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती. मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती.
या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले.

चंद्रकांत पाटील यांच्यावरही मुश्रीफ यांचे गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company