Ajit Pawar and Dhananjay Munde

‘अजितदादांबद्दल अनेक गोष्टी माझ्या नवऱ्याने मला सांगितल्या पण…’- करुणा मुंडे

मुंबई : आज करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. परंतु आता त्यांनी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील अडचणीत ओढले असल्याचे पहायला मिळत आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘माझ्यासोबत गेली ७-८ महिने जे सुरु आहे ते सर्व सांगण्यासाठी मी परळीमध्ये रविवारी १२ वाजता जाणार आहे. आतापर्यंत मला खूप वेळा धमकावलं गेलं आहे. माझ्या हाती अनेक गोष्टी लागल्या आहेत. त्या मी सोशल मीडियावर शेअर करणार तोच मला माझ्या मुलीच्या वयाच्या एका तरुणीने फोन करुन धमकावलं. मी तिला अजिबात घाबरणार नाही, असंही करुणा मुंडे या फेसबुक लाईव्हमध्ये म्हंटलं आहे.

फेसबूक लाईव्हमध्ये त्या म्हणाल्या की,  ‘माझ्या नवऱ्याने मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अजितदादांच्या देखील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.’ त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आलेलं आहे.

Advertisement –

Gadre Tea Company