malaika arora and arjun kapoor

मलायका सोबत अर्जुन कपूरचा पार्टी मूड

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) हि  नेहमीच स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. त्याचं बरोबर ती तिच्या फिटनेसला खूप मह्त्व देते. मलायका अरोराचे काही फोटो सध्या सोशलवर खूप व्हायरल होत आहेत, ज्यात ती करण जोहर, बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि बाकी बॉलिवूड स्टार्ससोबत पार्टी करताना दिसत आहे. फोटोमध्ये मलायकाने लाल रंगाचे कपडे परिधान केले होते.

यामध्ये तिचा स्टायलिश अंदाज खरोखर अप्रतिम दिसून आला आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबतच्या फोटोमध्ये मलायका अरोरा दिसत आहे. तर हे फोटो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. आता सोशल मीडियावरही हे फोटो खूप चर्चेत आहेत. याशिवाय मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पार्टीच्या वेळीच अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबत पोज देताना दिसत आहे. मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तिला शेवट सोनी टीव्हीवर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये जजच्या भूमिकेत पाहिले गेले होते.

गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्यासमवेत तिने या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळली होती. याशिवाय मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आपल्या फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारी मलायका अरोरा बर्‍याचदा योगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर शेअर करत असते. म्हणूनच ती आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.