Beware of rumors on social media!

सोशल मीडियावरील अफवांपासून सावधान !

सध्या सगळीकडे कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशामध्ये पंतप्रधानांकडून लॉकडाऊनची  घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लॉकडाऊनच्या काळामध्ये दिनांक 27 मे 2020 पासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मॅसेज फिरताना दिसत आहे.

‘मुंबई व पुणे शहरामध्ये कोणाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व नियमांचे कडक शिस्तीने पालन करण्याच्या हेतूने या दोन्ही शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे ; तसेच या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही काळापुरती चालू राहतील. अशा आशयाचा मजकूर असणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये. तसेच हा मेसेज फॉरवर्ड करू नये अशी माहिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच यातील मजकुर देखील खोटा असून कोरोना  महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या दोन्ही शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सायबर विभागातर्फे यावेळी सर्व नागरिकांना असे आवाहन केले आहे की ‘नागरिकांनी असे मेसेजेस किंवा कोणत्याही प्रकारची माहिती खातरजमा न करता आणि त्याची सत्यता न पडताळता फॉरवर्ड करणे किंवा अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे . असे खोटे मेसेज पाठवणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागातर्फे कायदेशीर कारवाई केली जाईल,अशी अफवा पसरवणे ही एक सामाजिक गुन्हा आहे त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व नागरिकांना विनंती करतात अशा मेसेजेस पासून लांबच राहण्याचे आवाहन केले आहे.