भाजपचा खोटारडेपणा उघड झाला; सचिन सावंतांकडून भाजपची कोंडी

भाजपचा खोटारडेपणा उघड झाला; सचिन सावंतांकडून भाजपची कोंडी

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नासाठी सध्या सर्वच जण आपापल्या परीने  मेहनत करताना दिसून येतात पण काही लोक मदतीचा दिखावा देखील करत आहेत. स्थलांतरित मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक रेल्वेच्या प्रवासी भाड्यात 85 टक्के इतका खर्च केंद्र सरकार करत असल्याचा भाजपने दावा केला होता, भाजपच्या या दाव्यातील फोलपणा आता उघड झाला आहे.

प्रवाशांच्या तिकीटाचा सर्व खर्च हा ज्या त्या राज्य सरकारने केला असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल  तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी स्पष्ट केले, त्यामुळे यातून भाजपचा खोटारडेपणा उघड झाला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ सर्व जनतेची माफी मागावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.झालेल्या प्रकाराबद्दल ट्विटरवर  व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. 

भाजपवर आरोप करताना सावंत म्हणाले की “भाजपचे नेते हे वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत होते, काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कामगारांच्या प्रवास खर्चातील 15 टक्के खर्च राज्य सरकार करत असून उरलेला 85 टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलत असल्याचे धादांत खोटे विधान केले होते.  तसेच त्यांच्या बरोबर इतर काही केंद्रीय मंत्र्यांनी देखील जनतेची दिशाभूल केली होती, ही जनतेची फसवणूक आणि खोटेपणा सहन न झाल्यामुळे आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे चंद्रकांत पाटील यांनी आदेशाचा कागद दाखवा अन्यथा जनतेची माफी मागा.” असे जाहीर आव्हान देण्यात आले होते.  आता जनतेसमोर खोटेपणा उघड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासह समस्त भाजप पक्षाने जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी सचिन सावंत यांनी यावेळी केली आहे.