chitra-wagh-on-sanjay-rathore

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला दिलेली शिक्षा मुख्यमंत्र्यांनी डोळ्या समोर आणावी’

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाष्य केल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड मुंबईत दाखल झाले आहेत. दुपारी साडेतीन वाजता ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले होते. परंतु या बैठकीत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी कोणतेही चर्चा मंत्रिमंडळाची झालेली नाही आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चर्चा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वर्षा निवास्थानी बोलवलं आहे. संजय राठोड आता सह्याद्री अतिथीगृहाकडून वर्षा निवास्थानात दाखल झाले आहेत. विरोधी पक्ष भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आत कारवाई करावी असं मत व्यक्त केल्याचे देखील सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राठोडांचा राजीनामा घेणार का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

संजय राठोड तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानाकडे रवाना

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायदानाची आठवण करून देत राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. ‘राजे शिवछत्रपतींच्या राज्यात रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडत, महाराजांनी मानसन्मानाने पाठवणी केलेली सुभेदाराची सून डोळ्यासमोर आणा, मुख्यमंत्री महोदय…म्हणजे या संजय राठोड सारख्या नराधमाचा राजीनामा घेणं तुम्हाला सुलभ होईल,’ असं भाष्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.