राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू हे मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यात आज 6555 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 206619 अशी झाली आहे. आज नवीन 3658 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 111740 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 86040 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 5, 2020