Corona in Kolhapur

जिल्ह्यात चोवीस तासात ५१८ कोरोना पॉझिटिव्ह : १४ जणांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ५१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ जणांचे मृत्यू झाले असून ५५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ११३, आजरा – ७, भुदरगड – ३, चंदगड- ६, गडहिंग्लज- १८, गगनबावडा – १, हातकणंगले – ९१, कागल – ३६,  करवीर- ७४, पन्हाळा – २७, राधानगरी – १४, शाहूवाडी – १६, शिरोळ – ५०, नगरपरिषद क्षेत्र – ५८, इतर जिल्हा व राज्यातील – ४ अशा ५१८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ९७, २३८

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ८६, ०१९

मृतांची संख्या – ५, ५३९

उपचार सुरू असलेले रुग्ण – ५,६८०

कोल्हापूरच्या कोरोना परिस्थितीला गोकुळ निवडणूक जबाबदार?