Santaji-Baba-Ghorpade.

कोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे

कोल्हापूर  : व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे, त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व…. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत…. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगिता निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार १७५ बेडचे मोफत कोविड सेंटर चालू केले असून, यामध्ये ३० बेड ऑक्सिजन आहेत. कोविड सेंटर मध्ये त्यांनी घरगुती आणि खेळकर वातावरण ठेवले आहे. या कोविड सेंटर मध्ये पेशंटना २ वेळचे पौष्टिक जेवण, गरम पाणी, नाष्टा, चहा याची चांगली सोय त्यांनी केली असून, स्वतः ते इथे दिवसभर असतात.

त्यांनी या अगोदर एप्रिल – मे महिन्यामध्ये सर्वत्र मोफत औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली होती. अशा प्रकारे कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी स्वच्छतादूत म्हणून संताजी घोरपडे पुढे आले आहेत. त्याबरोबरच अनेक गरजूंसाठी ते मदत योद्धा देखील   बनले आहेत.

कोरोनाच्या या महामारीमध्ये त्यांनी विविध माध्यमातून प्रशासनाला मदत केली आहे.

१७५ बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

कोल्हापूर जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगिता निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार १७५ बेडचे मोफत कोविड सेंटर चालू केले असून, यामध्ये ३० बेड ऑक्सिजन आहेत.

औषध फवारणीसाठी मनपाला केमिकल व टाकी…

व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरवातीला जीपवर फलक लावून कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर दौलतनगर, सम्राटनगरसह शहरात दाट वस्तीत औषध फवारणी केली. शहरातील पोलीस ठाणी, जिल्हा कारागृह, बालकल्याण संकुल व शहरातील इतर शासकीय कार्यालयातून औषध फवारणी करून ते निर्जंतुकीकरण केले. महापालिकेला औषध फवारणीसाठी दोन हजार लिटर टाकी व औषधांचा साठा स्वखर्चाने संताजी बाबा घोरपडे यांनी दिला.

५० कर्मचाऱ्यांचा सत्कार……

दौलतनगर, सम्राटनगरसह सायबर परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या ५० कर्मचाऱ्यांचा संताजी बाबा घोरपडे यांनी स्वखर्चातून सत्कार केला. महिलांना साडी व पुरुषांना ड्रेसचे कापड, फेटा देऊन गौरवण्यात आले.

९७ गावात औषध फवारणी

कोल्हापूर शहरातील स्वच्छते बरोबरच संताजी बाबा घोरपडे यांनी गगनबावडा व करवीर तालुक्यातील तब्बल ९७ गावात स्वखर्चाने औषध फवारणी केली. त्याबाबत ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात आले. स्वच्छतेच्या कामाबद्दल नुकताच आमदार विनय कोरे यांनी संताजीबाबा घोरपडे याचा सत्कार केला. त्याबरोबरच जिल्हा पोलीस दल व विविध प्रशासकीय कार्यालयांच्या वतीनेही त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

पाचशे कुटुंबाना अन्नधान्य वाटप

दौलतनगरसह इतर ठिकाणच्या पाचशे गरजू कुटुंबाना स्वखर्चातून जीवनावश्यक साहित्य वाटप केले. यात गहू, तांदूळ, साखर, चहापूड, धान्य, कडधान्यांसह इतर वस्तूंचा समावेश होता. अनेकांना भाजीचेही मोफत वाटप झाले.