sachin tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला(sachin tendulkar) कोरोनाची लागण झाली आहे. त्याने आपल्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. तसेच घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही सचिननं ट्वीट करुन सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संंघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते.
सचिननं सांगितलं की, आम्ही सर्वजण व्यवस्थित आहोत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करत आहोत. तसेच, सचिननं सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. करोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याच रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात येत्या रविवारी म्हणजे येत्या २८ मार्चच्या रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिला आहे.