Dhananjay Mahadik BJP

पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार – धनंजय महाडिक

कोल्हापूर – कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार आहे. पक्षाने आदेश दिल्यास महाडिक कुटुंबातील उमेदवार उभा असेल, अशी माहिती माजी खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik BJP) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. भाजप मित्रपक्षांचा उमेदवार अजून निश्चित नसल्याने धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक भाजप व मित्रपक्ष ताकदीने लढवणार आहे. उमेदवारीबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निर्णय घेणार आहेत. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार असून जर पक्षाने आदेश दिला तर कुटुंबातील उमेदवार रिंगणात असेल असेही ते यावेळी म्हणाले.

या मतदारसंघातील परिस्थिती बघितली तर, भाजप व मित्रपक्षांना खूप चांगले वातावरण आहे. पक्षाचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात महाडिक कुटुंबातील उमेदवार असेल तरच ताकद लागते म्हणून त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार असावा असा एक मतप्रवाह आहे. भाजपकडून त्यांना याबाबत कितपत आग्रह होतो, यावरही हा निर्णय अवलंबून आहे. याबद्दल विचारले असता त्यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज’चा दिवाळी दौरा शुभेच्छासाठीच 

पृथ्वीराज महाडिक यांनी जिल्ह्यात अनेक ठीकाणी सदिच्छा भेटी दिल्या. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीच मतदारांसह नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामागे इतर कोणताही हेतू नसल्याचेही धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.

भाजपची कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीची जबाबदारी महाडिक, कोरे आणि आवाडे यांच्या खांद्यावर

विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company