रात्री झोपण्यापूर्वी जरूर करा ‘या’ गोष्टी , होतील आरोग्यदायी फायदे !

रात्रीची झोप नीट झाली की दुसऱ्या दिवशीची सकाळ आनंददायी जाते पर्यायी दिवसही अगदी उत्तम जातो.त्यामुळे दिवसभर थकलेले आपण रात्री झोपताना हीच इच्छा बाळगून असतो की आपल्याला शांत झोप लागावी. मात्र रात्री झोपण्यापूर्वी आपल्या काही चुकीच्या गोष्टींमुळे शांत झोपेचा आनंद आपण घेऊ शकत नाही.याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.आज तुम्हाला काही टिप्स मिळतील ज्यामुळे झोपही चांगली होईल आणि तुमचे आरोग्यही उत्तम राहील.

  • रात्री झोपण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास अगोदर जेवावे – 

आपले रात्रीचे जेवण हे झोपण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास अगोदर करावे. आपण रात्री जेवण करून  लगेच झोपल्यामुळे आपली पचनक्रिया नीट होत नाही    आणि त्यामुळे अपचन , पित्त सारख्या समस्या त्रास आपल्याला सतावतात . रात्री जेवून झाल्यानंतर काही वेळापुरते शतपावली जरूर करावी. आपल्या पचनक संस्थेला अन्न पचवण्यासाठी किमान ३-४ तास लागतात त्यामुळे जेवणानंतर आपण लगेच झोपल्यास पचनक्रियेमध्ये अडथळा येतो आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ लागतो.

  • झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर राहा –

आजकाल मोबाईल , टीव्ही , लॅपटॉपच्या जमान्यात आपण दिवसरात्र या गॅजेट्सचा वापर करत असतो. रात्रीच्यावेळी झोपण्यापूर्वी आपल्यापैकी सर्रास सर्वजण  टीव्ही पाहत किंवा मोबाईलवर उशिरापर्यंत चॅटिंग , सर्फिंग करत झोपी जातो .या इलेकट्रोनिक्स गॅजेट्समुळे मेंदूवर आणि डोळ्यावर एक विशिष्ट प्रकारचा ताण येतो आणि परिणामी आपल्याला लवकर झोप लागत नाही.जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी किमान तासभर स्क्रीनटाईम कमी करावा लागेल.

  • हातपाय स्वच्छ धुवावेत –

रात्री बेडवर झोपण्यापूर्वी थंड पाण्याने हात पाय स्वच्छ धुवावेत . गार पाण्याने हात पाय धुतल्यामुळे तुमचे मन आणि शरीर शांत होते. तुमचे ब्लड सर्क्युलेशन सावकाश होते त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स फील होऊन चांगली झोप लागते .

  • ताण , तणाव विसरून झोपा  –

डोक्यात चालू असणाऱ्या विचारांमुळे झोप येत नसेल तर रूममध्ये एखादे शांत , सौम्य आवाजात गाणे लावावे जेणेकरून त्यामुळे तुम्हाला झोप लागेल.दिवसभरातल्या कामाचे टेन्शन आणि ताण तणाव दूर सारून रिलॅक्स होऊन बेडवर शांतपणे झोपा.  तुमच्या ताण तणावामुळे तुम्हाला झोप लागण्यास अडथळा होतो आणि झोप पूर्ण होत नाही.

 

  • रात्री पचण्यास हलका आहार घ्यावा –

आपले रात्रीचे जेवण हे झोपण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास अगोदर करावे.तसेच रात्री झोपताना नेहमी पचण्यास हलका आहार घ्यावा. रात्री झोपताना मांसाहार , तिखट जेवण शक्यतो टाळावे यामुळे आपल्या पचनसंस्थेला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि शरीर रिलॅक्स राहत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये पचायला हलके असे जेवण करावे.रात्री जेवून झाल्यानंतर काही वेळापुरते शतपावली जरूर करावी. आपल्या पचनक संस्थेला अन्न पचवण्यासाठी किमान ३-४ तास लागतात त्यामुळे जेवणानंतर आपण लगेच झोपल्यास पचनक्रियेमध्ये अडथळा येतो आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ लागतो.