Don't make any mistakes while drinking water, bad effects happen on the body!

पाणी पिताना अजिबात करू नका ‘या’ चुका , शरीरावर होतात वाईट परिणाम!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाणी म्हणजे जीवन आहे. आजकाल होणाऱ्या प्रदूषणामुळे , वाढती लोकसंख्या अशा अनेक मानवनिर्मित समस्यांमुळे या धरतीवर पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी शरीराला कमीत कमीत दिवसभरात ५-७ लिटर पाण्याची गरज भासते. आपण असा सल्ला कुठेतरी वाचला असतो किंवा कोणीतरी आपल्याला दिलेला असतो , म्हणून मग आपण दिवसभरात शरीराला हायड्रेट करण्यासाठी पाण्याचा भडीमार सुरु ठेवतो , मात्र चुकीची पाणी पिण्याची पद्धत ही शरीरासाठी तेवढीच घातक ठरते. म्हणून आज तुम्हाला अशाच पाण्याबद्दलच्या काही टिप्स देणार आहे.

  • शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यावे –

पुरुषांना ७.७ लिटर पाण्याची तर मुलींच्या,स्त्रियांच्या शरीराला दररोज २.७ लिटर पाण्याची आवश्यकता  असते.उन्हामध्ये जास्त वेळ घालवल्यास जास्त पाणी प्या. थंडीच्या दिवसात आपल्याकडून कमी पाणी पिले जाते त्यावेळी ठरवून पाणी पिणे योग्य ठरते. त्यामुळे कधीही शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षा कमी किंवा अधिक पाणी पिऊ नये.

  • पाण्याचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ खावेत –

 उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडी , कलिंगड , संत्री यासारखे पाण्याचे तत्वे असणाऱ्या फळांचा आहारामध्ये समावेश करावा. जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कायम टिकून राहील.

  • अनुशापोटी पाणी पिणे –

 तुम्ही खुपवेळ उपाशी असाल आणि खूप पाणी पित असाल तर ते जरूर टाळा . पाण्याऐवजी तुम्ही दूध , फळांचा रस असे पदार्थ प्या जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील. अन्न खाताना किंवा नाश्त्यासोबत कायम पाणी प्यावे. यामुळे आपल्याला कोरडे अन्न खाल्यास त्रास होत नाही.

  • व्यायामानंतर पाणी पिणे –

 आपल्यापैकी बरेच जण शरीराला बळकटी आणि आकार देण्यासाठी व्यायाम करतात. व्यायाम केल्यानंतर आपल्याला खूप घाम येतो आणि आपण दमतो. त्यामुळे व्यायाम सुरु करण्याआधी आणि व्यायाम झाल्यावर जरूर पाणी प्या , कारण घाम येऊन गेल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेट झाल्यासारखे वाटू शकते.आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो.