kolhapuri karbhar

आता प्रत्येकाला मिळेल व्यक्त होण्याची संधी -कोल्हापुरी कारभारचा अनोखा उपक्रम

कोल्हापूर : ‘कोल्हापुरी कारभार’ (kolhapuri karbhar) या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून कधीच व्यक्त न झालेल्या कोल्हापुरी माणसाला व्यक्त होण्यासाठी “व्यक्त व्हा” हा आगळा वेगळा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
अल्पावधीतच जनमानसात लोकप्रिय झालेल्या आणि कोल्हापूरच्या प्रत्येक बऱ्या वाईट घटनांना आपल्या चॅनेलमध्ये स्थान देणाऱ्या ‘कोल्हापुरी कारभार’ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ‘व्यक्त व्हा’ हा कार्यक्रम सुरु केला आहे.खरं तर कोल्हापूर हि कलेची नगरी.या कलानगरीत कित्येक कलाकार जन्मास आले. या कलानगरीतील प्रत्येक कलाकाराला,प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होता यावं,तसेच त्यांच्यातील अंगभूत कलागुण लोकांपर्यंत पोहोचावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
जगण्याच्या धावपळीत माणसाला एकमेकांशी बोलायलाही वेळ नाही.सोशल मीडियामुळे माणसं एकत्र आली असली तरी माणसातला प्रत्यक्ष संवाद मात्र तुटत चाललाय.हल्ली वाढत चालेले आत्महत्यांचे प्रमाण हे त्याचेच उदाहरण आहे.माणसाला माणसाशी बोलायला माणूस उपलब्श नाही.या कार्यक्रमामुळे प्रत्येकाला आपलं मन मोकळं करता येईल आणि त्यातून लोकांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर काही मार्ग शोधून उपायसुध्दा करता येतील.
जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापुरी कारभार या चॅनेलकडून करणेत आले आहे.