मजुर कुटुंबांना दरमहा ७५०० रुपये  रोख रकमेच्या स्वरूपात द्या-सोनिया गांधी

मजुर कुटुंबांना दरमहा ७५०० रुपये  रोख रकमेच्या स्वरूपात द्या-सोनिया गांधी

कोरोना महामारीच्या या संकटकाळामध्ये लॉकडाऊन मध्ये मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे, याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारवर  निशाणा साधला आहे.  सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला “आपल्या खजिन्याची  तिजोरी उघडा आणि देशातील गरजू तसेच मजूर वर्गाला तात्काळ मदत करा”!  असे आवाहन केले आहे.

देशातील गरजू कामगार, मजूर कुटुंबीयांना पुढील सहा महिन्यांसाठी दरमहा ७५०० रुपये  रोख रकमेच्या स्वरूपात द्यावी अशी मागणी देखील केंद्राकडे केली आहे.  काँग्रेसच्या #speakup  सुरू असणाऱ्या मोहिमेअंतर्गत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे ह्या मागण्या केल्या आहेत.

तसेच गेल्या 60 दिवसांपासून देशावर मोठे संकट आले आहे आणि त्यामुळे निर्माण झालेले तीव्र आर्थिक संकट सर्वजण अनुभवत आहोत, यावेळी लाखो मजुरांना औषध अन्नपाण्याशिवाय शेकडो-हजारो किलोमीटर अंतर अनवाणी आणि उपाशी पोटी पार करावे लागले, हे पाहून सर्वांनाच खूप वेदना झाल्या आहेत.  दरम्यान ‘कामगारांची तळमळ, त्यांचे हुंदके आणि त्यांचे दुःख हे प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले आहे,  परंतु हे दुःख केंद्र सरकारला ऐकू गेले नाही ! ‘ असं देखील यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या.