satej patil vs mahadik (2)

गोकुळमध्ये विरोधकांचा सत्ताधाऱ्याना दे धक्का !!

कोल्हापूर: गोकुळ दूध संघात तब्ब्ल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले आणि सतेज पाटील (satej patil) गट व मुश्रीफ गटाला सत्ता मिळाली. गोकुळमध्ये सत्ता आल्यानंतर मंत्री सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांनी निर्णयांचा धडाका चालू केला.  मुंबईतील टँकर भाड्यांमध्ये १७ पैशांची कपात करून गोकुळ दूध संघाची वार्षिक ५.५० कोटींची बचत करण्याचा निर्णय नवीन संचालक मंडळाने घेतला होता. २८/६/२०२१ रोजी झालेल्या गोकुळच्या बैठकीत पुण्यातील दूध विक्रीच्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता आणि पुण्यातील दूध विक्रीच्या ठेकेदाराला नोटीस देखील पाठवण्यात आली होती.

पुण्यातील दूध वितरण व पॅकेजचा गायत्री कोल्ड स्टोरेजचा ठेका माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे जावई विजय डेरे यांच्याकडे आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हा ठेका सध्याच्या संचालक मंडळातील कार्यकर्त्याला देण्यात यावा यासाठी धडपड चालू होती. मात्र याबाबत पुण्यातील राजकारण मध्ये आल्याने सध्याच्या संचालकांची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील बड्या नेत्याने याबाबत थेट नाराजी व्यक्त करत ठेका पूर्वरत करण्याचे आदेशच दिले आहे.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने ठेका रद्द करू नये यासाठी गोकुळच्या नेत्यांशी देखील चर्चा केल्याचे समजत आहे. पशुखाद्य वाहतुकीचा ठेका देखील माजी संचालकांला दर कमी दिल्याने द्यावा लागणार आहे.

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर व ताराबाई पार्क येथील ठेके बदलण्यात आले होते. त्यातील एक ठेका विद्यमान संचालकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आला होता. मात्र आता तो बंद करून दुसऱ्याच व्यक्तीला देण्याचा निर्णय झाल्याने हाती आले धुपाटणे अशी चर्चा सध्या रंगत आहे. त्याचप्रमाणे पशुखाद्य वाहतुकीचे ठेके देखील माजी संचालकांच्या निकटवर्तीयांनी कमी रक्कमेत टेंडर भरल्याने त्यांनाच द्यावे लागणार आहेत.