chandrakant patil

‘विधानपरिषदेसाठी बिनविरोधचा प्रस्ताव आल्यास विचार करू’ : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहत तर आहेच शिवाय या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या निवडणूकीमधील जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. याच अनुषंगाने कोल्हापुरात पत्रकार परिषदे झाली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ‘विधान परिषदेच्या सहा जागेवरील निवडणूक बिनविरोध करण्याबाबत अजून तरी तसा काही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर काय प्रस्ताव आहे, त्याबाबत विचार करू.’असे सूचक विधान केले.
सध्या विधान परिषदेच्या सहा जागेसाठी संपूर्ण राज्यामध्ये वातावरण ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत आहे.
काही ठिकाणी मतदारांना सहलीवर पाठवले जात आहे. बरेच दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले असल्याने त्यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पणाला लागली आहे.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

विधान परिषदेसाठी एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे बिनविरोधाची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, ‘भाजपची भूमिका ही समोरुन काय प्रस्ताव येईल त्यावर ठरेल. भाजप स्वतहून असा कोणताही प्रस्ताव देणार नाही. राज्यातील सहाही जागा आम्ही ताकतीने लढविणार आहोत. ४१५ पैकी १६५ मते आमच्याकडे आहेत. विजयासाठी ४३ मतांची गरज असेल. कोल्हापूरची लढत तुल्यबळ असेल. महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी ९० मते लागतात. भाजप आघाडीला जिंकण्यासाठी ४३ मतांची गरज आहे. तेवढी मते मिळवण्याची जुळणी आम्ही केली आहे.त्यामुळे कोल्हापुरात अमल महाडिक नक्की विजयी गुलाल उधळणार.  नागपुरातही भाजप आघाडीकडे ९० मते जादा आहेत. सहापैकी पाच जागा जिंकण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे कॉंग्रेसने कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी.’
‘आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली असून २६ नोव्हेंबरला माघारीची मुदत आहे. माझं म्हणणे आहे की, जे काय करायचं असेल तर लवकर करावे.’असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांची भूमिका महत्वाची असेल.

भाजपच्या राहुल महाडिक यांच्याकडून जयंत पाटलांचा “करेक्ट कार्यक्रम”

शरद पवारांचा फोन, तरीही शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव; हे घडले कसे?; राजकीय वर्तुळात चर्चा

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation