आपल्याला कोणी चेष्टेत जरी चोर म्हंटल तरी खूप राग येतो कारण आपल्याकडे चोरी करणे म्हणजे पाप मानले जाते, आणि ते सुद्धा देवळात म्हणजे महापाप मानले जाते. पण एक असे ठिकाण म्हणजे जिथे चोरी केल्यास पुत्ररत्न प्राप्त होते. आणि ते ठिकाण म्हणजे उत्तराखंडमध्ये असलेले एक देऊळ. या उत्तराखंड मध्ये असलेल्या एका देवळात अशी एक देवी आहे जिच्या देवळात तुम्ही चोरी केल्यास तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होते. ज्या जोडप्याला मुलगा हवा असतो असे ते इथे येऊन चोरी करतात व त्यांना पुत्रप्राप्ती होते. विश्वास नाही बसत? चला तर मग जाणून घेऊया या मागे असणारी कथा.
उत्तराखंडमधील त्या देवलाजवळील स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे , ज्या जोडप्याला मुलगाच हवा आहे अशा जोडप्याने एक लोकडा म्हणजे एक लाकडी बाहुला त्या देवीच्या देवळातून चोरून आपल्या सोबत घेऊन जायचा असतो आणि असे केल्यानंतर त्या जोडप्यास पुत्र रत्नाची प्राप्ती होते.
पुत्रप्राप्तीनंतर त्या जोडप्याने आपल्या पुत्रासमवेत पाय पडण्यास येथे यावे लागते त्याचबरोबर चोरलेल्या लाकडी बाहुल्यासोबत अजून एक लाकडी बाहुला आपल्या मुलाच्या हाताने या देवीच्या चरणी अर्पण करावा लागतो.
एके दिवशी एक राजा शिकारीसाठी जंगलात आला होता. शिकार शोधत असता त्याला तिथे एक मूर्ती दिसली. त्या राजाला अनेक वर्षे मुलगा नव्हता आपल्यामागे आपला कोणीच वारस नाही या काळजीने तो दुःखी होता त्यामुळे त्याने आपल्याला एक मुलगा व्हावा म्हणून नवस केला आणि तो निघून गेला. काही महिन्यांनी राजाला मुलगा झाला आणि त्या राज्याला वारस मिळाला. ही घटना १८०५ साली घडली. तेव्हा राजाने खुश होऊन त्या जंगलात जाऊन देवीच्या मूर्तीच्या जागी एक मोठे मंदिर बांधले . तेच हे चुडामणी देवीचे मंदिर.
अनेक दंतकथानुसार चुडामणी देवीचे मंदिर हे सतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. चुडीयाला गावामध्ये सती देवीच्या बांगड्या पडल्या म्हणून या देवीला चुडामणी देवी असे म्हटले जाते अशी आख्यायिका आहे.हे मंदिर चुडियाला गावामध्ये आहे.