Instead of tea or coffee, get up in the morning and consume these foods

चहा, कॉफीऐवजी सकाळी उठताच करा ‘या’ पदार्थांचे सेवन , उत्तम राहील आरोग्य

आपल्या दिवसाची सकाळ हि चहा, कॉफीने होते. उपाशी पोटी चहा / कॉफी घेणे हे शरीरासाठी खूपच घातक असते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपल्या पोटामध्ये अन्न गेलेले नसते त्यामूळे शरीराला ऊर्जा निर्माण करण्याची गरज असते. त्यामुळे चहा / कॉफी ऐवजी पुढे दिलेल्या पदार्थांचे सेवन केले असता तुमच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होऊन तुमची आरोग्य संपदा नक्कीच चांगली होईल.. 

ताजी ,स्वच्छ फळे –

 दिवसात फळे खाल्लेली शरीरसाठी कधीही चांगले असतात. सकाळी उठल्यानंतर साधारणतः २० ते २५ मिनिटाच्या आत जर का तुम्ही एखाद्या फळाचे अथवा सफरचंदाचे सेवन केले तर तुमची पाचनशक्ती सुधारते. फळामध्ये मध्ये फायबर , न्यूट्रीशियन्स , व्हिटॅमिन इत्यादी प्रकारचे पोषक तत्वे असतात.शरीरसाठी जे अत्यंत उपयुक्त आणि गरजेच असतात. 

भिजवलेले चणे,कडधान्य  –

  भिजवलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटिन्स,फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.याच्या सेवनाने दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहते. तसेच तुम्हाला थकवा देखील येत नाही. सकाळच्या वेळी मूठभर भिजवलेल्या कडधान्यांसोबत सकाळी मधाचे सेवन केले तर तुमची फर्टिलिटी वाढण्यात सुद्धा मदत होते.

ड्रायफ्रूट –

    मिक्स ड्रायफ्रूट म्हणजेच काजू, बदाम ,अकोरोड, पिस्ता इत्यादी एकत्रितपणे खाल्ल्याने खूप फायदा होतो. ड्रायफ्रूटमुळे जास्त एनर्जी मिळते . तसेच याच्या सेवनाने तुमच्या वय लवकर दिसून येत नाही. अँटी एजिंग साठी ड्रायफ्रूट्स खाल्ले जातात. याच्या खाण्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.