IPL-2022

IPL-2022 : कोणता खेळाडू कोणत्या टीम मध्ये आणि मानधन किती असणार

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग IPL-2022 हंगामाचे रिटेंशन मंगळवारी पूर्ण झाले असून असून अधिकृतरित्या जुन्या ८ फ्रँचायझींनी संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंना आपल्या टीममध्ये पुन्हा कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार काही फ्रँचायझींनी आपल्या संघातील सरस ४ खेळाडूंना आपल्या टीम मध्ये कायम ठेवले आहे. मात्र काही संघांनी ३ तर काहींनी केवळ २ खेळाडूंना कायम केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स च्या संघाने गेल्या ३ वेळच्या हंगामात आपल्या खेळाने प्रभावित केलेल्या ४ खेळाडूंना टीम मध्ये कायम केले असून यामध्ये रिषभ पंत, अक्षर पटेल आणि पृथ्वी शॉ या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर एन्रीच नॉर्किए या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाला पुन्हा संधी मिळाली आहे. पंतला १६ कोटींमध्ये, अक्षर पटेलला ९ कोटींमध्ये, पृथ्वी शॉला ७.५ कोटींमध्ये आणि एन्रीच नॉर्किएला ६.५ कोटींमध्ये संघात कायम केले आहे. आता लिलावासाठी त्यांच्याकडे ४८ कोटी रुपये उरले आहेत.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

गतउपविजेता कोलकाता नाईट रायडर्सने सुद्धा ४ खेळाडूंना संघात कायम केले असून यामध्ये आंद्रे रसल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण या खेळाडूंना कायम केले. रसेलला १२ कोटींमध्ये कायम केले तर चक्रवर्ती आणि व्यंकटेशला प्रत्येकी ८ कोटींमध्ये, तसेच नारायणला ६ कोटींमध्ये रीटेन केले गेले. त्यांच्याकडे लिलावासाठी आता ९० पैकी ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत.
आयपीएलचा सर्वात पहिला विजेता राहिलेल्या राजस्थान रॉयल्स टीमने २०२२ साठी ३ खेळाडूंना कायम केले आहे. यामध्ये संजू सॅमसनला १४ कोटीं, जॉस बटलरला १० कोटींमध्ये आणि युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला ४ कोटींमध्ये संघात कायम केले आहे. त्यामुळे संघाकडे लिलावासाठी ६८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. राजस्थान रॉयल्सने प्रतिभावान गोलंदाज जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सला संघात कायम केलेले नाही.
सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला पुन्हा घेतले असून अब्दुल समाद आणि उम्रान मलिक खेळाडूंना संघात कायम केले आहे. विलियम्सनला १४ कोटींमध्ये, तर समाद आणि मलिक यांना प्रत्येकी ४ कोटींमध्ये संघात कायम करण्यात आले आहे. त्यामुळे लिलावासाठी सनरायझर्स हैदराबादकडे ६८ कोटी रुपये उरले आहेत.
पंजाब किंग्स संघाने फक्त दोनच खेळाडू घेतले आहे. मयंक अगरवाल आणि अर्शदीप सिंग या दोन खेळाडूंना त्यांनी कायम केले आहे. पंजाब किंग्जने सलामीवीर फलंदाज मयंकसाठी १२ कोटी रुपये खर्च केले. तर वेगवान गोलंदाज अर्शदीपला ४ कोटींसह कायम केले. त्यामुळे आता लिलावासाठी संघाकडे तब्बल ७४ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल कायम राहावा असे वाटत होते. पण त्याने लिलावात उतरणे पसंत केल्याने तसे करता आले नाही. त्यामुळे आता येत्या हंगामात मयंकच्या हाती संघाची धुरा सोपवली जाऊ शकते.
आयपीएल २०२१ विजेता असणारी चेन्नई सुपर किंग्स टीमने आपल्या ४ खेळांडूंना संघात कायम केले आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा पहिलाच रिटेन केले आहे त्यानंतर लगेच एमएस धोनी रिटेन केलेला दुसरा खेळाडू आहे. जडेजाला १६ कोटींमध्ये, तर धोनीला १२ कोटींमध्ये संघात कायम केले गेले. शिवाय आयपीएल २०२१ हंगाम गाजवलेल्या ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला चेन्नईने कायम केले आहे. मोईन अलीला ८ कोटींमध्ये आणि ऋतुराज गायकवाडला ६ कोटींमध्ये कायम केले आहे. त्यामुळे आता लिलावासाठी चेन्नईकडे ४८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.
आयपीएल सिझनचे सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव या भारतीय खेळाडूंना, तर कायरन पोलार्ड या परदेशी खेळाडूला टीममध्ये कायम करून घेतले. संघाने ४ खेळाडूंना संघात कायम केले असल्याने आता लिलावासाठी संघाकडे ४८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासाठी १६ कोटी, जसप्रीत बुमराहसाठी १२ कोटी, सूर्यकुमार यादवसाठी ८ कोटी आणि पोलार्डसाठी ६ कोटी रुपये मोजले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या सिझनसाठी खेळाडूंची रिटेंशन प्रक्रिया सुरू झाली असून सर्वप्रथम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपली खेळाडूंची यादी जाहीर केली असून बेंगलोरने त्यांचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून ओखळला जाणारा विराट कोहली याला येत्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. त्यांनी १५ कोटी खर्च करत विराटला कायम केले.
विराटबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही ७ कोटींची रक्कम मोजत संघात कायम ठेवण्यात आले आहे. तर विदेशी खेळाडू अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला घेतले आहे. त्याला आरसीबीने तब्बल ११ कोटींचे मानधन दिले गेले आहे.

IPL 2022: कोणता संघ कोणत्या खेळाडूला करणार रिटेन, पाहा संपूर्ण यादी

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation

.