kdcc bank result

KDCC Bank Result : कोल्हापूर जिल्हा बँकेवर ‘सत्ताधारी’ आघाडी’चं वर्चस्व; दिग्गजांसह विद्यमान संचालक पराभूत

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. मात्र ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी पॅनेलला घाम फोडला. सध्या शिवसेना गटाचे तीन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार सेनेच्या बाजूचे झाले आहेत. तर सत्ताधारी गटाचे 11 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीआधीच सहा जण बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर राहील असा दावा संजय मंडलिक यांनी केला होता. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. आमदार प्रकाश आवाडे त्याच बरोबर सर्जेराव पाटील पेरीडकर, अशोक चराटी हे विद्यमान संचालक देखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत अबिटकर बंधूंवर जोरदार टीका झाली. यांच्यामुळेच निवडणूक लागली अशी सत्ताधारी गटाने टीका केली होती. मात्र आपण उमेदवारीसाठी पात्र होतो हे अर्जुन अबिटकर यांच्या विजयाने दाखवून दिलं. (kdcc bank result)

Gadre Tea Company
Gadre Tea Company

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निवडून आलेले उमेदवार

राजर्षी शाहू विकास आघाडी (सत्ताधारी)

राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने

राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी (विरोधक)

संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर

अपक्ष

रणवीरसिंह गायकवाड

याआधी बिनविरोध निवडून आलेले सत्ताधारी

हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी.एन.पाटील, राजेश पाटील,ए. वाय पाटील,अमल महाडिक

Organic Farming – सेंद्रिय शेतीचा ‘सुफल’ डॉक्टर

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation