kdcc bank vinay kore

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर

कोल्हापूर-  कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. मात्र ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी पॅनेलला घाम फोडला.सत्ताधारी गटाचे 11 उमेदवार निवडून आले आहेत तर शिवसेना प्रणीत परिवर्तन आघाडीने जोरदार मुसंडी मारत तीन उमेदवार निवडून आणले आणि शिवसेनेच्या निर्णायक पाठिंब्यावर रणवीर गायकवाड अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निकालानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते विनय कोरे यांनी आघाडीच्या नेत्यांवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. आमदार विनय कोरे यांनी विरोध केलेले संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे शिवसेना प्रणीत परिवर्तन विकास आघाडी कडून पुन्हा एकदा निवडून आले आहेत तर जनसुराज्यचे जि.प.सदस्य आणि विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर  हे शाहूवाडीतून पराभूत झाले. तसेच भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव देखील आमदार कोरे यांच्या जिव्हारी लागला.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

यावेळी बोलताना आमदार कोरे म्हणाले की, सत्तारूढ गटातील नेते प्रामाणिक राहिले असते तर विरोधी गटातील एकही जागा निवडणून आली नसती. सर्वजण एकत्र यावे अशी अपेक्षा होती; मात्र माझ्या अपेक्षांना विश्वासघाताने सुरुंग लावला. ज्यांनी हे विश्वासघाताचे पाप केले त्यांना त्याची योग्य वेळी किंमत मोजावी लागले असा इशारा आमदार विनय कोरे यांनी सत्ताधारी गटातील नेत्यांना दिला.

KDCC Bank Result : कोल्हापूर जिल्हा बँकेवर ‘सत्ताधारी’ आघाडी’चं वर्चस्व; दिग्गजांसह विद्यमान संचालक पराभूत

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation