कोदे तलाव परिसराची कोदे ग्रामस्थांकडून स्वच्छता,स्वच्छतेतून तलाव परिसर केला काचमूक्त

“कोदे तलाव परिसराची कोदे ग्रामस्थांकडून स्वच्छता,स्वच्छतेतून तलाव परिसर केला काचमूक्त”

गगनबावडा/ सर्जेराव खाडे

विकेंड सेलीब्रेशन व निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोदे तलावावर वर्षाच्या तिन्हीही ऋतूमध्ये विकेंड सेलीब्रेशन करण्यासाठी नेहमीच असंख्य पर्यटक येत असतात,तलावामध्ये पोहणे,जंगल भ्रमंती करण्याबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेजवाणी अर्थात पाटर्या केल्या जातात,याच मेजवाणी वेळी मेजवाणीसाठी आलेले पर्यटक मद्य सेवनासाठी मद्याच्या बाटल्या बरोबर आणतात,मद्यसेवन व मेजवाणी नंतर बरोबर आणलेले प्लॅस्टीक साहित्य व मद्याच्या रिकाम्या वाटल्या याच तलाव परिसरात फेकून देतात.फेकलेल्या व नशेमध्ये मद्यपीनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचांचा खच्च तलाव परिसरात पसरला होता.
कोदे गावातील ग्रामस्थांनी या तलाव परिसरात अस्ताव्यस्त पडलेला कचरा व मद्याच्या बाटल्या तसेच मद्यपीनी फोडलेल्या काचा आणि याच काचांचा तलाव परिसरात साचलेला खच्च पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने तलावात वाहून जाऊन तलावाच्या पाण्यात मिसळू नये त्याचबरोबर तलावाच्या पाण्यातून काचा इतरत्र पसरू नये,यासाठी कोदे गावातील कोदे बुद्रुक,ठाकरवाडी,आंबेवाडी,पाटीलवाडी,साबळेवाडी गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून कोदे तलाव काच मुक्त करण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहिम राबवून तलाव परिसराची स्वच्छता केली.
या स्वच्छता मोहिमेप्रसंगी ग्रामस्थांनी तलाव परिसरात पडलेल्या काचा,मद्याच्या हजारो बाटल्या व प्लॅस्टीक कचरा काढून संपूर्ण तलाव परिसर स्वच्छ केला. तलाव परिसरात साचलेल्या काच्चांमुळे निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेले अनेक पर्यटक याच काचांमुळे जखमी होण्याच्या घटना घडल्या होत्या.
तलाव परिसरातील काचांची स्वच्छता करून पर्यटकांना पर्यटनांचा आनंद लुटता यावा,या काचांमुळे फक्त पर्यटनाच्या उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये,तसेच याच काचा पाण्याच्या प्रवाहाने तलावात मिसळून नदीच्या पाण्याबरोबर सर्वत्र पसरू नये या उदात्त हेतूने कोदे गावातील ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिम राबवून सामाजिक बांधीलकी जपली आहे.
कामानिमित्त बाहेर गावी असणाऱ्या व लॉकडाऊनमुळे गावात अडकून पडलेल्या तरुणांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून सोशल डिस्टसींगचे पालन करत कोदे तलाव परिसर काचमूक्त करण्याचा प्रयत्न केला,या स्वच्छता मोहिमेसाठी कोदे ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभ लाभले.