Kolhapur Vidhanparishad

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ

कोल्हापूर- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक कसबा बावडा येथील मेडिकल कॉलेजवर झाली. आमदार विनय कोरे व आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या भूमिकेसह पुढील रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली. शनिवारपासून तालुकानिहाय मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. विधानपरिषद निवडणुकीत आमदार कोरे व आमदार आवाडे हे आघाडीसोबतच राहतील, असे नेत्यांना वाटत होते. मात्र गुरुवारच्या बैठकीत कोरे व आवाडे यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी आघाडीच्या नेत्यांची कसबा बावडा येथे बैठक झाली. या बैठकीला आजी-माजी आमदार उपस्थित होते.

माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ

कसबा बावडा येथे झालेल्या बैठकीनंतर एका माजी आमदाराने आपल्या समर्थकांची आणि मतदारांची बैठक घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीतील विद्यमान मंत्र्यांवर सर्वानी नाराजी व्यक्त केली. आपण सत्तेत असून देखील आपली काम होत नसल्याचा आरोप समर्थकांनी केला. या बैठकीत आपण महाविकास आघाडी सोबत राहायचे असे सांगणाऱ्या या माजी आमदाराची यामुळे चांगलीच पंचाईत झाली. एका समर्थकाने तर आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला महाविकास आघाडीतीलच एका उमेदवारा विरोधातच निवडणूक लढवायची असल्याने जरा सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. तो कार्यकर्ता असही म्हणाला की, तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या व्यासपीठावर दिसत असाल तरी चालेल पण आम्हाला आमचा निर्णय घेण्याची मोकळीक मिळावी. त्यामुळे आता माजी आमदारांची चांगलीच गोची झाली.

हे हि वाचा 

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- भाजपच्या बैठकीस कोरे, आवाडे हजर

पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार – धनंजय महाडिक

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company