kolhapur election

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- भाजपच्या बैठकीस कोरे, आवाडे हजर

कोल्हापूर : भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय होणार आहे. उमेदवार निवडीचे अधिकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच असून, ते ठरवतील त्यांनाच ही उमेदवारी मिळणार हे निश्‍चित आहे. आमदार पाटील यांचा कल पाहता शौमिका महाडिक यांच्या उमेदवारीची शक्‍यता जास्त वाटत आहे.

कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीस आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राहुल आवाडे, प्रा.जयंत पाटील, सुमित कदम उपस्थित होते. राज्यात भाजपसोबत आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीसोबत अशी भूमिका कोरे यांनी मांडली होती, त्यामुळे या बैठकीला विनय कोरे उपस्थित राहिल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला.

यावेळी झालेल्या बैठकीत भाजपचे चिन्हावर असलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आवाडे यांची ताराराणी आघाडीचे नगरसेवक आणि जनसराज्य पक्षाचे असलेले सदस्य तसेच या सर्वांना मानणारी मंडळी अशांबाबत प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीमध्ये ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याचवेळी पक्ष म्हणून सर्व प्रकारच्या पाठबळाविषयीही चर्चा झाली.

बैठकीनंतर सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शिरोली येथे जाऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली व निवडणूक रणनीतीबाबत चर्चा केली.

उमेदवार भाजपचाच

हि निवडणूक भाजप पुरस्कृत न लढता भाजपच्यावतीने लढविण्यात येणार आहे. जो कोणी उमेदवार असेल त्याला भाजपचा एबी फॉर्म भरावा लागणार आहे. त्या उमेदवारास कोरे, आवाडे यांनी पाठींबा द्यायचे असे बैठकीत ठरविण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उमेदवार निवडणार आहेत.

मुंबईत उमेदवार ठरणार

शौमिका महाडिक की राहुल आवाडे यापैकी एका नावावर शनिवारी मुंबईत शिक्कामोर्तब होणार आहे.

महादेवराव महाडिक रिंगणाबाहेर
या बैठकीला माजी आमदार महादेवराव महाडिक उपस्थित नव्हते. या निवडणुकीत ते उमेदवार असणार नाहीत हे जवळजवळ स्पष्ट आहे.

हाळवणकर, प्रा. जयंत पाटील यांचा नकार

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी ही निवडणूक लढविण्यास स्वतःहून नकार दर्शविला. मी जनतेतून निवडणूक लढविणारा कार्यकर्ता आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. जयंत पाटील यांनाही उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी आर्थिक मर्यादा असल्याचे स्पष्ट केले.

भाजपची कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीची जबाबदारी महाडिक, कोरे आणि आवाडे यांच्या खांद्यावर

पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार – धनंजय महाडिक

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company