M G Patil Gaganbawada

वाढदिवस विशेष – तळागाळातील जनतेचा पुढारी: एम.जी.पाटील

गगनबावडा (मा.संभाजी पाटील (सर), धुंदवडे, ता.गगनबावडा)

माणसाच आयुष्य फार विलक्षण असतं, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते वळत राहत, आणि असं एखादं आडवळण येतं की त्या वळणावरती त्या माणसाच आयुष्यात हरवून जातं अगदी शब्द कोड्यात हरवलेल्या एखाद्या शब्दाचा सारखं ! ही माणसं स्वतःच्या आचारांन, विचारान कर्तुत्वाने स्वतःच्या मस्तकावरती चैतन्याचं पांढरे शुभ्र चांदणं निर्माण करतात, पण आभाळातून आलेले काही वैफल्याचे हात हे चांदणे पुसतात. म्हणून या माणसांच्या आयुष्याच्या पाट्या कोऱ्या होत नाहीत तर तो त्यांच्या जगण्याचा उन्मेशाचाआणखी एक नवा रंग असतो. गुलाबी थंडीत सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाला जहाल चटके देणारे निखारे स्वतःच्या हृदया वरती ठेवावेच लागतात कारण अस्तित्वाला चटके बसल्याशिवाय मस्तकातील परिवर्तनवादी चळवळीची निर्मिती होत नाही. अशी परिवर्तनवादी चळवळची निर्मिती करणारी माणसं स्वतःच्या आचारांचा, विचारांचा, कर्तृत्वाचा विकास करत असताना स्वतःच्या कर्तृत्वाचा सावलीचा विस्तार कुठपर्यंत झाला याचा कधीच विचार करत नाहीत। मुळात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायच.
चिखलामध्ये रुतलेल्या लोकांना जागं करायचं, चालतं करायचं चालणाऱ्या पाय वाटेवरती त्याच दोन पायांचे हजारो शत्रू निर्माण झाले म्हणून न डगमगता त्या लोकांच्या ध्येयाचा पुढारी व्हायचे हे पुढारीपण ही माणसं गेल्यानंतरसुद्धा यांच्या विचारांना विचारांना एक नवसंजीवनी देऊन जायला लागतात. यांच्याकडे संपत्तीचा दारिद्र्य असेलही कदाचित पण यांच्या वैचारिक श्रीमंती समोर कुबेराची श्रीमंती सुद्धा टिपक्यांची रांगोळी काढून जायला लागते. असंच एक सामान्य कुटुंबात जन्मलेलं असामान्य व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे दिन दलितांचे कैवारी, आदरणीय एम. जी पाटील साहेब !
धामणी खोरा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो दुर्गम डोंगराळ भाग ! याच भागामध्ये 27 मार्च 1976 साली गुंडू रावजी पाटील व पार्वती गुंडू पाटील यांच्या पोटी साहेबांचा जन्म झाला. कोणताही राजकीय वारसा पाठीशी नसताना सर्वसामान्य लोकांच्यासेवेतूनआपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अवघ्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच 1997 ते 2002 पर्यंत धुंदवडे गावची सरपंच पदाची धुरा सांभाळली. सर्व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेब सदैव तयार असतात. स्वतःसाठी जगलास तर मेलास , दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास या उक्तीचा प्रत्यय जर घ्यायचा झाला तर त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे एम. जी. पाटील साहेब. कोणतेही राजकीय पद नसताना सुद्धा गेली पंचवीस वर्ष हा माणूस गगनबावडा सारख्या दुर्गम डोंगराळ भागांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर गोरगरिबांच्या हृदयावर विराजमान झाला आहे. याचं कारण म्हणजे दुसर्‍यासाठी जगणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. या त्यांच्या कार्याच्या जोरावर पंचायत समिती गगनबावडा चे स्वीकृत सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार पाहिला आहे. या कालखंडामध्ये त्यांनी मोफत आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावे, रक्तदान शिबिर, संजय गांधी निराधार योजना असो अथवा श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना असो, रेशन कार्डचा कोणाचा प्रश्न असो किंवा आरोग्याच्या काही समस्या असो, बेघर घराचा विषय असो अथवा युवकांना रोजगार मिळावा म्हणून धडपड असो, कुणावर अन्याय झाला असेल म्हणून आंदोलन असो, महापुर असू दे अथवा दुष्काळ गोरगरिबांची कनव असलेल हे व्यक्तिमत्त्व नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतं. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर धामणी खोऱ्याचा कायापालट करण्याचे काम कोट्यवधी रुपयांचा निधी आणून साहेबांच्या माध्यमातूनहोताना दिसत आहे. गगनबावडा तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर पोचवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आणि धडपडणारे व्यक्तिमत्त्वामुळे साहेब आज युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या विकासापासून अद्यापही वंचित असलेल्या वाड्या-वस्त्या धनगर वाड्याच्या पर्यंत विजेची सोय, पाण्याचा प्रश्न असो आरोग्याच्या समस्या असो, कुठे अपघात झाला असो ताबडतोब त्याठिकाणी हजर राहण्याचे काम साहेब नेहमीच करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे आमच्यासारख्या युवकांना सामाजिक कार्याची आवड निर्माण होऊन झाली आहे. अशा या कार्यकर्तृत्व वाण व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.