ms-dhoni-crying-girl

रडणाऱ्या चिमुकीलाला धोनीकडून मिळाले सर्वात भारी गिफ्ट; तुम्ही पाहिलं का?

दुबई- आयपीएल २०२१ मधील रविवारी (१० ऑक्टोबर) झालेल्या पहिला क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा ४ विकेट्सने पराभव केला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. ऋतुराज गायकवाडला त्याच्या तुफान अर्धशतकासाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र, या सामन्यादरम्यान एका चेन्नई समर्थक चिमुकलीने सर्वांना आपली दखल घ्यायला लावली. आता तिचा आणि धोनीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, चेन्नईचे खेळाडू बाद होताना पाहून स्टेडिअममधील चिमुकलीने हंबरडा फोडला. ती खूप रडत होती. सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. यादरम्यान खेळपट्टीवर मोईन अली आणि धोनी हे खेळाडू होते. यावेळी स्ट्राईक मोईनकडे होती. मात्र, टॉम करन टाकत असलेल्या १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अली कागिसो रबाडाच्या हातून झेलबाद झाला.

मोईन बाद होताच धोनी स्ट्राईकला आला. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. यानंतर करनने पुढील चेंडू वाईड टाकला. यावेळी चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर धोनीने चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारत सामना खिशात घातला. यानंतर धोनीने चिमुकलीला एक अनोखे गिफ्ट दिले.

धोनीने स्वाक्षरी केलेला चेंडू चिमुकलीला दिला भेट म्हणून
सामना जिंकल्यानंतर धोनीने आपली स्वाक्षरी असलेला एक चेंडू त्या चिमुकल्या मुलीला भेट म्हणून दिला. यावेळी ती खूपच उत्साही होती. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की, धोनी एका चेंडूवर आपली स्वाक्षरी करतो आणि स्टेडिअममध्ये असलेल्या चिमुकलीकडे तो चेंडू फेकतो. यावेळी तो चेंडू फेकताना सांगतो की, चेंडू त्या मुलीला द्यायचा आहे. यादरम्यान मुलीसोबत असणारा मुलगा कदाचित तिचा भाऊ तो चेंडू घेतो.

या व्हिडिओला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळाली असून हा व्हिडिओ आतापर्यंत ६.६ हजारांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत ८०० पेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

“मेंटर धोनी आणि प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेतील”

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company