Locusts reached Maharashtra directly from Pakistan; Farmers worried

पाकिस्तानातून थेट महाराष्ट्रात पोहचली टोळधाड ; शेतकरी चिंतेत

मागील काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील सहा दशकातील सर्वात मोठ्या टोळधाडीची घटना आपण ऐकली होती  , सध्या विदर्भाला देखील या टोळधाडीचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना या मोठ्या टोळधाडीचा सामना करावा लागत आहे. सध्या पाकिस्तानातून मध्यप्रदेशात आणि आता सरळ महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर ,वर्धा जिल्ह्याला टोळधाडीचा सामना करावा लागत आहे. यात या टोळांनी शेतकऱ्यांची मोसंबी संत्र आणि भाजीपाला उध्वस्त झाला आहे.पण अर्थातच नाकतोडा प्रजातीचा हा उपद्रवी कीटक ,  याचे झाडांची हिरवी पाने हे खाद्य आहे. या कीटकाचे तोंड घोड्यासारखे दिसत असल्याने नागपूर तसेच विदर्भात त्याला ‘घोड्या’ असेही म्हटले जाते . आधीच कोरोनाने हैरान झालेल्या शेतकऱ्यांनचे टोळधाडीमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. आता या गरीब शेतकर्‍यांसमोर या नव्या संकटातून सावरण्याचे एक नवीन आव्हान तयार झाले आहे.

पाकिस्तान मधून भारतामध्ये प्रवेश केलेल्या टोळधाडीने या आधी राजस्थानमध्ये आठ जिल्ह्यात तब्बल 1 लाख 50 हजार हेक्‍टर क्षेत्रातल्या शेतीतील रब्बी पिकांचे खूप मोठे नुकसान केले. यावेळी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यातील विविध भागात सुमारे 5 लाख 27 हजार क्षेत्रांमध्ये याबाबतचे विशेष सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी टोळधाडीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर वरच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले होते .

सध्याची विदर्भातील टोळधाड ही सुरुवातीला मध्यप्रदेशातून वरुड ,मोर्शी तालुक्यात यानंतर ही टोळधाड शिंगोरी ,पाळा ,देवकुंडी ,सालबर्डी ,घोडदेव ,भाईपुर मध्ये हळूहळू पसरू लागली. दरम्यान या प्रजातिने अंडी दिल्यास यावेळी त्यांच्या नव्या किटकांचा जन्म होऊन हा धोका दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या वर्षी भारतामध्ये टोळधाडीचा पहिला हल्ला राजस्थानमधील गंगानेर मध्ये 11 एप्रिल 2020 साली झाला होता यानंतर. केंद्र सरकारच्या लॉकस्त वॉर्निंग ऑर्गनायझेशनने पुन्हा एका टोळधाडीचा इशारा दिला होता.  या वेळी हे टोळ पाकिस्तान मधून भारतामध्ये दाखल झाले होते. यावेळी या टोळधाडीने जयपूर तसेच आसपासच्या परिसरात पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सध्या महाराष्ट्रात आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना टोळधाडीचा सामना करावा लागू शकतो या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.