Mahadevrao Mahadik

गोकुळच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी लावला भेटींचा धडाखा

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक(Mahadevrao Mahadik) व आमदार पी एन पाटील यांनी आपले नेतृत्व कायम ठेवण्यासाठी राजकीय भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

महादेवराव महाडिक यांनी मंगळवारी, इचलकरंजीत जाऊन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी गोकुळ निवडणुकी संदर्भात चर्चा केली.

त्या पाठोपाठ महाडिकांनी, आज बुधवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोहचले. या दोन्ही नेत्यांमध्ये १ तास चर्चा झाली.

गोकुळच्या निवडणुकीत सत्यजित पाटील सरुडकर यांची घरवापसी

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना हा राज्य पातळीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी गोकुळ निवडणुकीत शाहू आघाडीने त्यांना सामावून घेतले नाही. शिवाय शेट्टी हे गेले काही दिवस ते वीज बिल प्रश्न व शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाविकास आघाडी विरोधातही रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहेत.

राजू शेट्टी यांच्या भेटीनंतर महाडिक यांनी आपली गाडी मा.आमदार उल्हास पाटील यांच्या घराकडे वळवली. त्या नंतर त्यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांची भेट घेवून गोकुळ निवडणुकी संदर्भात चर्चा केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे.