mahadik patil group

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाडिक- पाटील गट आमने-सामनें

कोल्हापूर- विधान परिषदेच्या निवडणुकीत कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गटात राजकीय संघर्ष  बुधवारी उफाळून आला. उमेदवारी अर्ज छाननीवेळी पालकमंत्रीपद सतेज पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर ५ ठिकाणी महाडिक गटाने आक्षेप घेतला. यावरुन  दोन्ही गटाचे कार्यकर्ते(mahadik patil group) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमने-सामने आले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा  दिल्या. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणाव निर्माण झाला.
बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली. अकरा वाजण्याच्या सुमारास महाडिक गटाचे माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम हे वकिलांसह जिल्हाधिकारी आले. भाजपचे उमेदवार  माजी आमदार अमल महाडिक हे सोबत होते. महाडिक गटाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली.महाडिक गटाच्या हरकती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीर चर्चा सुरू झाली. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाडिक आणि सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आमने-सामने येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवले.
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माजी खासदार धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक, माजी नगरसेवक राजसिह शेळके, विजय सूर्यवंशी, यांच्यासह समर्थक उपस्थित होते. दुसरीकडे पालकमंत्री गटाचे माजी नगरसेवक सुनील मोदी, , राजेश लाटकर, भूपाल शेटे, सुभाष बुचडे, दुर्वास कदम, महादेव नरके, मोहन सालपे, बाबा बुचडे उपस्थित होते.

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company