mla chandrakant jadhav

वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी कोल्हापूर महानगरपालीकेस ३६ लाखाचा निधी : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर- कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आमदार निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस दिला. निधीचे पत्र पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.

राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधीतून अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदिसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालीकेने आमदार जाधव यांच्याकडे ऑक्सीजन सिलेंडर्स जंबो, वॉर्ड सिलेंडर्स, ऑक्सीजन रेग्युलेटर्स, व्हायटल साईन मॉनिटर्स, फार्मासिटीकल फ्रिज, व्हॅक्सीन बॉक्स, कोव्हिड १९ विषाणुच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधनसामुग्री व टॉसिलीझुमॅब इंजेक्शन या वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ३६ लाख रुपयांची मागणी केली. या साहित्य खरेदीसाठी आमदार जाधव यांनी आमदार निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी महापालिकेस दिला.