Chandrakant Jadhav Anna

आमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न

आमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न

कोरोनाच्या महामारीत प्रत्यक्ष भेटण्याऐवजी थेट मोबाईलवरून जनतेची कामे पूर्ण करण्याचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कोल्हापूरी पॅटर्नचे जनतेतून स्वागत होत आहे. प्रत्यक्ष भेट नको थेट संपर्क हे आमदारांचे आवाहन म्हणजे ”एक कॉल विषय सॉल” असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरकरातून व्यक्त होत आहे.
आज कोरोनाच्या जागतिक महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. घरीच थांबा आणि कोरोनाला हरवा असे आवाहन प्रशासन करीत आहे. विना कारण रस्त्यावर उतरणाऱ्यांना पोलीसांचा प्रसाद खावा लागला आहे. अशा परिस्थितीत जनतेची कामे करण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार चंद्रकांत जाधव यांनी स्वतःचा एक पॅर्टन तयार केला. कार्यालयाच्या बाहेर तसेच सोशल मिडीयावर कामासाठी प्रत्यक्ष भेटण्या ऐवजी थेट कॉल करा या मथळ्याखाली आमदारांनी स्वतः सह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर दिले. या नंबरवर कोणाचा मिस कॉल जरी आला तर त्यांना परत कॉल करण्याच्या सुचना दिल्या. यामुळे नागरिकांचे घर बसल्या आमदारांच्याकडील काम झटपट पूर्ण होऊ लागली. नागरिकांना हवी असणारी आमदारांची पत्रे थेट घरी मिळू लागलीत. परिणामी प्रत्यक्ष भेट होत नसली तरी काम मार्गी लागत असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत.
आमदार जाधव यांनी कोरोनाच्या काळात आपले व्यवस्थापन कौशल्य पणास लावून, अनेक प्रश्न सोडवले आहेत. मतदारसंघातील गरजूंना जिवनावश्यक वस्तू घरपोच करणे, समविषम तारखेला व्यापार सुरू करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधाचे घरोघरी वाटप करणे, नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवणे, कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनाशी सतत संपर्क करणे अशा विविध कामातून आमदार जाधव यांची जनतेशी जोडलेली नाळ कोरोना संकटाच्या काळात घट्ट झाली आहे. याच बरोबर घर बसल्या आमदारांच्याकडे असलेले काम पूर्ण करण्यासाठी राबवलेला प्रत्यक्ष भेट नको थेट मोबाईलवर संपर्क हा उपक्रम प्रचंड यशस्वी झाला आहे. घरी रहा आणि कोरोनाला हरवा हे प्रशासनाने आवाहन केले असताना आमदारांच्याकडील काम घरातून फक्त फोन वरून होत आहे. यामुळे आमदार जाधव यांनी तयार केलेल्या कोल्हापूरी पॅटर्नचे कोल्हापूरवासीयांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
जनतेने कामासाठीच विधानसभेत पाठवले आहे. यामुळे केलेल्या कामाचा डोलारा पेटण्याऐवजी आलेल्या प्रत्येक नागरिकांचे काम झाले पाहिजे असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.