Mohammad shami

मोहम्मद शमीला ट्रोल करण्या आधी हे जाणून घ्या.  

दुबई- वर्ल्ड कप च्या आजपर्यंतच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला नेहमी मात दिली आहे. मात्र यावेळी पाकिस्तानी संघानं रविवारी टीम इंडियाला प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला आणि हा पराभव चाहत्यांना पचवता आला नाही.  भारताचे १५१ धावांचे सामान्य लक्ष्य पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या खेळाच्या  जोरावर पार केले. भारतीय गोलंदाजांची कामगिरी या सामन्यात फार खराब झाली. पण टीकाकारांच्या ट्रोलिंगला मोहम्मद शमीला सामोरे जावे लागलं.  शमीवर काही नेटिझन्सनी नेहमी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली गेली. पण शमीला ट्रोल करणाऱ्यांना  कदाचित हे माहित नसेल की, तो १४ महिन्यांच्या त्याच्या मुलीला ICU मध्ये सोडून देशासाठी मैदानावर उतरला होता.

हा प्रसंग आहे पाच वर्षांपूर्वीचा. ऑक्टोबर २०१६ मध्ये कोलकाता येथे भारत आणि न्यूझीलंड मध्ये कसोटी सामना होता. त्यावेळी शमीची १४ महिन्यांची मुलगी प्रचंड आजारी पडली आणि तिला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे तिला ICU मध्ये दाखल करावं लागलं होतं. या परिस्थितीतही शमी संपूर्ण सामना खेळला. एवढंच नव्हे तर त्यानं सामन्यात ६ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. हा सामना जिंकून भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचला होता.

मात्र शमी ला ट्रोल होताना पाहून भारताचे माजी खेळाडू  इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनीही ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिलं आहे. “मीही त्याच भारत-पाकिस्तान सामन्याचा एक भाग आहे की जिथं भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हे मी काही वर्षांपूर्वीचं वातावरण सांगू इच्छितो. त्यावेळी मला कुणीच असं पाकिस्तानात निघून जा वगैरे बोललं नव्हतं. सध्या जो मुर्खपणा सुरू आहे तो लगेच थांबवायला हवा”, असं इरफान पठाण ने ट्वीट केल आहे.

मोहम्मद शमीवरील हा ऑनलाइन हल्ला अतिशय आश्चर्यकारक आहे. मी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे आणि जो कुणी भारतीय संघाची कॅप परिधान करतो त्याच्या मनात देशाप्रती सर्वोच्च भावना असते. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात तुझा जलवा दाखवून दे”, असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. तर मोहम्मद शमी आम्हाला तुझा अभिमान आहे, असं ट्विट युजवेंद्र चहल यानं केलं आहे.

शिवाय सचिन तेंडुलकर देखील शामीच्या पाठीशी उभा आहे. त्याने आपल्या ट्विट द्वारे क्रिकेट फॅन्स ला आठवण करून दिली की जेंव्हा आपण एखाद्या संघाला पाठिंबा देतो तेंव्हा तो पाठिंबा संघातील सर्वच खेळाडूंसाठी असतो. तो पुढे म्हणतो की महोम्मद शामी हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असा एखादा खराब दिवस येतोच. मी शामी आणि भारतीय संघाच्या पाठीशी आहे.

Ind Vs Pak-धोनीचा अंदाज अचूक ठरला : वाचा काय म्हणाला होता धोनी 

Follow us –

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company