MS Dhoni

Ind Vs Pak-धोनीचा अंदाज अचूक ठरला : वाचा काय म्हणाला होता धोनी

दुबई : . टी 20 विश्वचषक 2021 ला सुरुवात तर झाली खरी पण खरी रंगत असते ती भारत – पाकिस्तान सामन्यादरम्यान परंतु यावेळी मात्र भारतीयांचा पदरी निराशा आली. रविवारी झालेला पराभव भारतीय चाहत्यांना शक्य तितक्या लवकर विसरणे आवश्यक आहे, कारण या दिवशी असे काहीतरी घडले जे गेल्या 29 वर्षांपासून होऊ शकले नाही. टी 20 विश्वचषक 2021 च्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला 10 गडी राखून विजय मिळवला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय फलंदाजांची कामगिरी लाजीरवाणी ठरली, तर गोलंदाजांनीही भारतीय संघाला वाचवू शकला नाही. विश्वचषकातील पाकिस्तानचा भारताविरुद्ध हा आजपर्यंतचा पहिला विजय आहे. तथापि, माजी कर्णधार आणि विद्यमान संघाचे मार्गदर्शक एमएस धोनीने(MS Dhoni) पाच वर्षांपूर्वी भाकीत केले होते की, शेजारी देश एक दिवस विश्वचषकात आपल्यावर नकीच भारी पडेल.

खरे तर 2016 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार धोनी असताना टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर धोनी पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, ‘आम्ही त्यांच्याकडून विश्वचषक 11-0 ने जिंकला याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु एक सत्य हे देखील असेल की पाकिस्तान कडून आम्ही कधीच हरणार नाही असे होणार नाही. आज नाहीतर उद्या भले10 वर्षांनी वा 20 वर्षांनी किंवा ५० वर्षांनी पाकिस्तानकडून हारु. असे होऊ शकत नाही की आपण नेहमीच जिंकत राहतो. माहीचा अंदाज रविवारी खरा ठरला आणि पाकिस्तानने टीम इंडियाविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय नोंदवला.

भारताकडून 152 धावांचे लक्ष्य 17.5 षटकांत कोणतेही विकेट न गमावता पाकिस्तान टीमने सहज गाठले. बाबर आझम 68 धावांवर नाबाद परतला आणि मोहम्मद रिझवानने 79 धावा केल्या. गोलंदाजीत शाहीन आफ्रिदीने उत्तम कामगिरी बजावत केएल राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या विकेट घेतल्या. विराटने टीम इंडियासाठी सर्वाधिक 57 धावा केल्या आणि तो टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच बाद झाला. टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात टी -20 विश्वचषकातील पराभवाने केली आहे.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company