Mushrif

विधानपरिषदेच्या मतदारांची माफी मागतो – हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत माजी आ. अमल महाडिक आणि काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार होती. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई होती. त्यासाठी दोन्ही उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंब सुरू केला होता. राजकीय जोडण्या लावण्याच्या हालचालींना वेग आला होता. मतदारांना आपल्याकडे आकर्षित कऱण्यासाठी आमिषे, आश्वासनांचा वर्षाव सुरू होता. लक्ष्मीदर्शनामुळे ही निवडणूक  लक्षवेधी ठरू लागली होती. सहलींचे नियोजन, राजेशाही बडदास्त यामुळे मतदारांची चंगळ सुरू होती.मात्र, मतदारांच्या दृष्टीने गंगाजळी ठरणारी ही निवडणूक बिनविरोध झाल्याने मतदारांचा हिरमोड झाला असून त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यावर माध्यमांशी संवाद साधताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(hasan mushrif) यांनी मतदारांची माफी मागत असल्याची खोचक टिप्पणी केली. यावर उपस्थित सर्वजण हास्यात बुडाले.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

या निवडणुकीत जिल्ह्यातील नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सभापती मतदान करत असतात. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी या मतदारांनी उमेदवारांकडून आर्थिक रसद कशी मिळेल, याची तरतूद करून घेतली होती. तर काही मतदार भरघोस निधी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात होते. महाविकास आघाडीचे बहुतांश मतदार सहलीवर गेले आहेत. तर भाजपच्या मतदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू होते. तर काही मतदारांनी आपले कर्ज फेडण्याच्या अटींवर उमेदवारांना पाठिंब्याचा शब्द दिला होता. त्यासाठी उमेदवारांची यंत्रणाही कामाला लागली होती. मात्र, निवडणूकच बिनविरोध झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

तळ्यात-मळ्यात असणाऱ्या मतदारांचा भाव वधरला होता. त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्यांची पूर्तता करताना उमेदवारांच्या नाकीनऊ आले होते. त्यांची मनधरणी करताना दमछाक होत होती. काठ्यावरच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. परंतु, शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या समझोत्यानुसार राज्यातील  विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फोडीफोडीच्या राजकारणाला आणि मतदारांच्या पळवापळवीला चाप बसला. तर दुसरीकडे, सहलीवर गेलेल्या मतदारांना माघारी परतावे लागणार असल्याने त्यांची निराशा होणार आहे.

कोल्हापूर विधान परिषद निवडणुक बिनविरोध: भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात समझोता

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation