Gramvikas Mantri Hasan Mushrif

हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रिपद सोडणार !

अहमदनगर- राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडणार आहेत. त्यांनीच  पत्रकारांशी बोलताना या बाबीला दुजोरा दिला.

गृह जिल्हा म्हणून मला कोल्हापूरकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगत आगामी काळात नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी अनेक निवडणुका होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचाही त्यात समावेश आहे. या स्थितीत एक मंत्री दोन जिल्ह्यांकडे कसे लक्ष देऊ शकणार? त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता यावे, यासाठी मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री बैठकीत नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याबाबत पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती. मुश्रीफ शुक्रवारी अकोले तालुक्याच्या दौर्‍यावर होते. त्यांच्या हस्ते सुमारे 12 कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामविकास खात्याला जयोस्तुते मॅनेजमेंटला दिलेले कंत्राट रद्द करावे लागल्याने त्यात घोटाळा झाल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात त्यांना नोटीस दिली असून, 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company