nitesh rane

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी पार पडली आणि आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सध्या शिवसेनेचं संचालक मंडळ असलेली ही बँक आता जवळपास भाजपाच्या हातात जाण्याची चिन्हे निकाल लागेल तसा स्पष्ट होत आहेत.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले. 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १९ पैकी १० जागांवर राणे यांच्या आघाडीचा विजय झाला, तर महाविकास आघाडीला ५ जागा मिळाल्या. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मावळते चेअरमन आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांचा पराभव झाला असून हा शिवसेनेला मोठा धक्का मनाला जात आहे.  या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सदरची मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जाईल.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष राणेंच्या ताब्यात होती. मात्र 2019 साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली होती. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली आहे. तर 2019 साली सत्ता काबीज केल्यानंतर यावेळीदेखील सत्ता कायम राखण्याचे लक्ष ठेवून शिवसेना अर्थात महाविकास आघाडीने पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Organic Farming – सेंद्रिय शेतीचा ‘सुफल’ डॉक्टर

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation