organic farming

Organic Farming – सेंद्रिय शेतीचा ‘सुफल’ डॉक्टर

कोल्हापूर: जमिनीचे आरोग्य हा एकूणच अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच जमिनीचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्यासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे वाढीव उत्पादनाच्या हव्यासापोटी तिच्यावरच आपण घाला घालू लागलो तर एक दिवस आपणाला सकस अन्न काय असते, यावर संशोधन करावे लागेल. यासाठी सेंद्रिय शेती हा एक उत्तम मार्ग आहे. जमिनीचा पोत सुधारून तो टिकविण्याचे काम ही खते करतात. यासाठी सुफल अ‌ॅग्रीकॉन प्रा. लि. चे जयवर्धन उल्हास माने हे ‘सुफल’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे(organic farming) वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी  ‘सुफल’ची अनेक खते तयार केली आहेत, जी महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त आहेत. ही खते जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच उत्पादनातही वाढ होण्यास मदत करतात. त्याविषयी….

अलीकडे अनेक शेतकरीमित्र सेंद्रिय शेतीच्या फायद्यांबाबत शेतक-यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करीत आहेत. कोल्हापूर मधीलही अनेक युवक यात सहभागी झाले आहेत. सुफल अ‌ॅग्रीकॉन प्रा. लि. चे जयवर्धन माने हे ‘सुफल’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून  शेतकऱ्यांसाठी अनेक खते तयार केली आहेत. या खतांतून कृषी वाढीला चांगली मदत होत आहे. सेंद्रिय शेती कशी करावी, याबद्दल त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोलाचे मागदर्शन लाभत आहे. साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन होऊन ते शेतीचे सेंद्रिय पद्धतीने नियोजन करण्याचे काम करतात. त्यांची तयार केलेली सर्व उत्पादनेही सेंद्रिय आहेत. भरकटलेल्या शेतीला पूरक म्हणून त्यांनी या उत्पादनाची निर्मिती केली आहे. अलीकडील शेती अपेक्षेप्रमाणे उत्पादन देत नाही. त्याला अनेक  कारणे आहेत. कोणती पिके घ्यावीत, ती कशी करावीत, कोणत्या वेळी करावीत, या गोष्टींचा  आढावा घ्यावा लागेल. कोल्हापूर, सांगली भागात जमीन आहे, भरपूर पाणी आहे. मात्र, तेथून अपेक्षित उत्पादन होत नाही.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

सुफल अग्रीकॉनने अतिशय सखोलपणाने उसाला लागणाऱ्या खतांबाबत दीर्घकाळ संशोधन केले आहे. त्यानुसार खतांचे नियोजन ज्या ज्या वेळी जे जे घटक पदार्थ उसाला जरूरी असतात, ते ते उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे उसामध्ये अतिशय चांगली वाढ होऊन त्यांचे वजन वाढते. परिणामी, शेतकरीबंधूचे उत्पन्न चांगले वाढते व महत्वाचे म्हणजे या खतांमुळे जमिनीची सुपिकताही वाढते, जी आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.

हे सर्व घडून येते ‘सुफल’च्या विविध औषधे आणि त्यांच्या अचूक क्रमवारीमुळे. उसाला सर्वप्रथम सुफल ‘पॉवर’ आणि ‘गोधन’ ची आळवणी केली जाते. सुफल गोधन हे मुख्यतः देशी गाईपासून मिळणा-या शेण, गोमूत्र, दूध, तूप आणि दही या पाच पदार्थापासून बनलेले आहे. ह्या आळवणीमुळे पांढऱ्या मुळांची अतिशय वाढ होते, जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या वाढून वाढीसाठी लागणाऱ्या अन्नघटकांचे विघटन होऊन उपलब्धतेच्या कार्यास प्रचंड गती मिळते, जमिनीतील कर्ब वाढून जमिनीचे कर्ब नत्र गुणोत्तर सुधारते आणि जमीन सुपीक बनते, अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण थांबते परिणामी रासायनिक खत मात्रांचे प्रमाण कमी लागते.

ही बाब ऊस वाढीसाठी महत्वाची ठरते. त्यानंतर सुफल ‘एनर्जी’ ची फवारणी केली जाते. त्यामुळे पिकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढते व पीक रोगाला बळी न पडल्याने त्याच्या वजनात वाढ होते. त्यानंतर ‘ग्रीनेक्स’ची फवारणी पानांवर केल्याने पानांचा आकार ही वाढतो व काळोखी येते. या सर्वांमुळे पानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाशसंश्लेषण होऊन , अन्नाचा साठा वाढतो व वजनही वाढते. सर्वात शेवटी सुफल ‘झेस्ट’ची फवारणी महत्त्वाची ठरते. या फवारणीमुळे पिकामध्ये जोम वाढतो, पचनाची क्रिया चांगली होते व आरोग्य वाढल्याने वजन व उंची वाढते. त्याचवेळी लागवडीवेळी वापरलेल्या सुफल ‘शक्ती’ या जवळपास १७ सर्वोत्कृष्ट घटक पदार्थानीयुक्त अशा खतांचे विघटन होऊन त्यातील नैसर्गिक एनपीके पिकाला सहजपणे उपलब्ध होत जातात.

ही खते व औषधे पूर्णपणे सेंद्रिय असल्याने जमिनीचे कोणतेच नुकसान न करता तिचे आरोग्य वाढवून तिला सुपीकता बहाल करीत असतात.

अशा तऱ्हेने सुफल अ‌ॅग्रीकॉनने आपल्या जुन्या शेती तंत्रज्ञानामध्ये आधुनिक विज्ञानाची सांगड घालून नवे आरोग्यदायी शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे.

जयवर्धन माने 

सुफल अ‌ॅग्रीकॉन प्रा. लि.

7387999329 / 7387099329

हे हि वाचा 

फौंड्री कामगार ते आमदार चंद्रकांत जाधव यांचा थक्क करणारा प्रवास

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation