P N Patil Sadolikar

भोगावती साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात देणार एफआरपी प्रमाणे 3003 रुपये

राशिवडे- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी एफआरपी प्रमाणे ३००३ रुपये देण्याची घोषणा भोगावती सहकारी साखर  कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील(P N Patil Sadolikar) यांनी केली. कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बॉयलर प्रदीपन कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे व भाग्यश्री डोंगळे या दाम्पत्यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार पाटील म्हणाले ‘आमच्याकडे सत्ता आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत असलेला हा कारखाना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र साखर कारखानदारी समोरील अडचणींचा विचार करतात सातत्याने कर्जाचा बोजा वाढला आहे. त्याचे व्याज भागवणे हे आव्हान ठरत आहे. यातून ही प्रतिवर्षी एफआरपीप्रमाणे ऊस दर कारखान्याचे पगार व अन्य देणी वेळेत भागवली आहेत. यंदा जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन कमी झाल्याचा फायदा भारतीय साखर कारखानदारीला होणार आहे. ब्राझीलमध्ये साखरेचा दुष्काळ असल्याने साखरेचे दर वाढत आहेत. याचा निश्चित फायदा आपल्याला होईल. पुढील वर्षी निश्चित आपला कारखाना स्वबळावर दर देईल. एफआरपीप्रमाणे आम्ही ३००३ रुपये यंदाच्या गळीत हंगामासाठी एकरकमी देणार आहोत. शिवाय कामगारांच्या बोनसचा प्रश्न चर्चेनंतर निकालात काढू. सभासदांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

स्वागत उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे’ जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानीदेवी साळुंखे, पंचायत समिती सदस्य विजयसिंह भोसले, उत्‍तम पाटील, सुशील पाटील -कौलवकर, सरपंच आक्काताई कारंडे, भारती डोंगळे सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी आर. डी. पाटील यांनी केले. आभार संचालक बी. आर. पाटील यांनी मानले.

हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रिपद सोडणार !

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company