dhananjay mahadik kolhapur

“खरेदी करा आपल्या माणसांकडून, आपल्या शहरात”, मा. खासदार धनंजय महाडिक यांचे भावनिक आवाहन

कोल्हापूर: कोरोनाने कोल्हापूरमध्ये हाहाकार माजवला असून गेले तीन महिने रुग्णांची संख्या दीड ते दोन हजारांच्या घरात आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने सर्वात चिंतेची बाब कोरोनासोबतच कोल्हापूरचा कोरोनाचा मृत्यूदर असून, दररोज मृत्यूसंख्याही ३० ते ५० आहे. कोल्हापूरमध्ये दररोज होणारे हे मृत्यूंचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध जवळजवळ ९० दिवस होते.
या कालावधीत सर्व व्यापार,व्यवसाय ठप्प असल्याने व्यापारी मेटाकुटीला आला असून वीजबील, भाडे, हफ्ते भरायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.सर्व व्यापार, व्यवसाय ठप्प असल्यामुळे बहुतांश नागरिकांच्या हाताला काम नव्हते, परिणामी बेरोजगारी वाढली.

सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सकाळी ७ ते संध्याकाळी ४ पर्यंत उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून व्यापारी वर्गाला त्यामुळे दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मा. खासदार धनंजय महाडिक(dhananjay mahadik kolhapur) यांची एक फेसबूक पोस्ट चर्चेत आहे, यामध्ये त्यांनी लोकांना आपल्या माणसांसाठी आपणच असे भावनिक आवाहन करून,आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी बांधवांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले आहे . सोशल मिडीयावर लोकांनी सुद्धा या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

महाडिक कुटुंबीय आणि भाजप-ताराराणी आघाडीने उभारले १२५ ऑक्सिजन बेडचे मोफत कोविड सेंटर