कोल्हापूर :
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली असून आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील व सत्तेच्या चाव्या आपल्याकडे कशा ठेवता येतील याच्या जोडण्या लावण्यात नेतेमंडळी गर्क असल्याचे दिसू लागले आहेत.जिल्ह्यातील काही प्रमुख पक्ष व संघटनांनी यासाठी मोर्चेबांधणी केली असून कार्यकर्ते देखील उत्साहाने कामाला लागले आहेत.
या सभागृहाची मुदत आगोदरच संपुष्टात आली होती पण कोरोेनाच्या संकटामुळे ही निवडणूक पुढं ढकलावी लागली.या निवडणुकीचे वेध अनेक इच्छुक उमेदवारांना होते. कोरोनाचा ज्वर पूर्णतः उतरला नसला तरी कमी अधिक प्रमाणात जनजीवन पूर्ववत होत असल्याने निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून महापालिकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करताच इच्छुकांचे हात उमेदवारी मिळवण्यासाठी सरसावलेत.राजकीय पक्षाच्या कार्यालयात आणि नेतेमंडळींच्या निवासस्थानी भेटीगाठीचा ओघ वाढला असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्टच आहे. शिवाजी उद्यमनगर या प्रभागातून शिवसेना एका प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख संदीप पाटील यांच्या पत्नी प्रियांका संदीप पाटील याठिकाणी प्रबळ उमेदवार ठरु शकतात.
संदीप पाटील हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून गेली १० वर्षांपासून अधिक काळ सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करत आहेत.या कालावधीत त्यांनी आरोग्य,शिक्षण व रोजगार या त्रिसूत्रीवर भर देत लोकांच्या थेट संपर्कात राहून जनतेच्या अडचणीची सोडवणूक व संकटकाळी धावून येण्याची वृत्तीने ते लोकांमध्ये चर्चिले जात आहेत. जनतेच्या विश्वासास पात्र अनेक विधायक कामे करुन दाखवून शिवसेना पक्ष वाढीसाठीदेखील त्यांनी भरीव योगदान दिलं आहे.
या निवडणुकीसाठी संदीप पाटील यांनी जोरदार तयारी केली असतानाच शिवाजी उद्यमनगर हा प्रभाग सर्वसाधारण महिला असा आरक्षित झाल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला मैदानात उतरवण्याचा निर्धार केला. प्रियांका पाटील यांनी देखील प्रभाग पिंजून काढत जनसंपर्क वाढवला आहे. गतकाळात विविध सामाजिक उपक्रम आणि संकटकाळी मदतीला धावून आले असल्याने त्यांना लोकांची पसंती असेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि याचा परिपाक म्हणून शिवसेनेकडून प्रियांका पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जातेय.