raju shetty on sugar factory

एकरकमी एफआरपीसाठी जयसिंगपूरमध्ये होणार स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी आक्रमक

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद होणार आहे. ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीवर राजू शेट्टी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा पहिल्यांदाच गाळप हंगामाआधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेची आतुरतेनं वाट पाहत असतात. राजू शेट्टी ऊस परिषदेत जी भूमिका मांडतील त्याआधारे स्वाभिमानीकडून आंदोलनाची पुढील दिशा ठरते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलनाचं रणशिंग जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतून फुंकलं जातं. त्यातच कागलच्या शाहू कारखान्याने राज्यात प्रथमच एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केल्याने इतर कारखान्यांनी सुद्धा एकरकमी एफआरपी द्यावी यासाठी राजू शेट्टी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

तसेच जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुनही राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली. या परिषदेतही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले जाते.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company