raju shetti on sayaji hotel

घरफाळा-पाणीपट्टी आपल्यालाच, सयाजी हॉटेलचे १२ कोटी थकीत – राजू शेट्टी

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या महापालिका आणि गोकुळच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत, दोन्ही बाजूनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर महापालिकेच्या घरफाळा घोटाळ्यासंबंधी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते.

धनंजय महाडिक यांनी मंत्री सतेज पाटील यांच्या वर डी.वाय.पी मॉल व ड्रीम वर्ल्ड मध्ये घरफाळा घोटाळा केल्याचे कागदोपत्रा सहित सादर केले होते व या संदर्भात महापालिका आयुक्तांची देखील भेट घेतली होती.

घोटाळ्याचे हे आरोप ताजे असताना काल माजी खासदार राजू शेट्टी यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये राजू शेट्टी म्हणतात कि , घरफाळा-पाणीपट्टी हे आपल्यालाच, त्या पालक मंत्र्यांचे १२ कोटी रुपये थकीत आहे सयाजी हॉटेलचे. आम्ही जरा आंदोलन केले तर पोलीस लगेच येतात आणि सयाजीला जायची पोलिसांची हिम्मत नाही.

हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर येताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.