raju shetty on sugar factory

राजू शेट्टी यांनी दिला साखर कारखाने बंद करण्याचा इशारा

परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस व सोयाबीन परिषद आयोजित करण्यात आली होती ती गुरवारी परभणी तालुक्यातील पिंगळी येथे पार पडली. या परिषदेला परभणी जिल्ह्यातून शेतकरी उपस्थित राहिले होते. या परिषदेत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार उसाचे पैसे देण्याबाबत साखर कारखान्यांना आठ दिवसाची मुदत दिली आणि जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत पैसे शेतकऱ्यांना देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना बंद करतील, असा थेट इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
या परिषदेवेळी शेट्टी पुढे म्हणाले कि, जेव्हा सोयाबीनचे दर 10 ते ११ हजार रुपये क्विंटल होते त्यावेळी शेतकऱ्यांकडे सोयाबीन लागवड नव्हती आणि आज शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारामध्ये विक्रीस आणले तर त्याचे दर लगेच कमी झालेत. याचे प्रमुख करण म्हणजे केंद्र सरकारचे आयातीचे धोरण आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक सोयापेंड आयात केली जेणेकरून सोयाबीनचे बाजारामध्ये दर कमी होतील. शेतकऱ्यांच्या लुटीचा हा धंदा फार पूर्वीपासून चालत आला आहे आणि आजही तेच चालू आहे. केंद्र सरकारच्या नेहमीच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कायम भरडलाचा जात आहे.

शिवाय मराठवाडामधील शेतकरी बांधव संघटीत नाही त्यामुळे कारखानदार लोकांचे फावते ते शेतकऱ्यांना एफआरपी ची रक्कम देत नाहीत. आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे आणि साखर कारखान्यांवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. जर ८ दिवसात पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर रिलायन्स पिक विमा कंपनीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक- भाजपच्या बैठकीस कोरे, आवाडे हजर

पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार – धनंजय महाडिक

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company