Rohit Sharma

4th Test Live: रोहितचे षटकारासह शतक पूर्ण; टी ब्रेकपर्यंत भारताकडे १०० धावांची आघाडी

लंडन-  इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस आहे.

रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिल्या सत्रातीलच लय दुसऱ्या सत्रातही कायम ठेवताना भारताची आघाडी वाढवत नेली. एका बाजूने रोहितने सावध खेळ केला, तर दुसऱ्या बाजून पुजाराने काहीसा आक्रमक पवित्रा स्विकारलेला दिसला. दरम्यान रोहितने त्याचे मालिकेतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने ६४ व्या षटकात मोईन अलीविरुद्ध षटकार खेचत त्याचे शतक पूर्ण केले. हे शतक त्याने २०४ चेंडूत पूर्ण केले.

 

Gadre Tea Company
Gadre Tea Company

 

या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा, तर कसोटी कारकिर्दीत ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याने पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. या दोघांनी भारताची आघाडी १०० धावापेक्षा अधिक वाढवली. रोहितचे हे परदेशी खेळपट्टीवर पहिलेच शतक आहे.

भारताने दुसरे सत्र संपेपर्यंत ६९ षटकात १ बाद १९९ धावा केल्या. तसेच भारताने १०० धावांची आघाडी घेतली आहे. रोहित १०३ धावांवर नाबाद आहे. तर पुजारा ४८ धावांवर खेळत आहे.