sanjay-rathore

संजय राठोड तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानाकडे रवाना

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाष्य केल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड मुंबईत दाखल झाले आहेत. यवतमाळमधील निवासस्थानाहून सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते सपत्नीक रवाना झाले. दुपारी साडेतीन वाजता ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले होते. परंतु या बैठकीत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी कोणतेही चर्चा मंत्रिमंडळाची झालेली नाही आहे. अशी माहिती सध्या मिळत आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चर्चा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वर्षा निवास्थानी बोलवलं आहे. संजय राठोड आता सह्याद्री अतिथीगृहाकडून वर्षा निवास्थानाकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोड यांना आभ्य मिळणार कि त्यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

शिवसेनेकडून मंत्री संजय राठोडांना माध्यमांशी न बोलण्याचे आदेश

संजय राठोड हे सकाळी यवतमाळहून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या विमानाने ते मुंबईला आले. यावेळी त्यांची पत्नी शीतल राठोड सोबत आहे. “माझं सुरळीत काम सुरु झालं आहे. माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होतोय” अशी माहिती राठोडांनी निवासस्थानाहून निघताना दिली. आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती.