satej patil vs mahadik

सतेज पाटील यांचा निवडणूक अर्ज लवकरच अवैध ठरणार – धनंजय महाडिक

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हा विधान परिषदेची निवडणूक दहा डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील व भाजप आघाडीकडून माजी आमदार अमल महाडिक उमेदवार आहेत. बुधवारी, २४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यावेळी महाडिक गटाने पालकमंत्री पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षेप घेतला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महाडिक गटाने उपस्थित केलेल्या आक्षेपावर बोलताना ‘हे सगळे विषय माझ्या अखत्यारित येत नाहीत. ’असे स्पष्ट करत सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.
माजी खासदार महाडिक म्हणाले, ‘ वास्तविक, उमेदवारी अर्ज भरताना संपूर्ण माहिती सादर करायची असते. सर्व संपत्ती, इस्टेट, घर, जमीन, जुमला कर्ज शपथपत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे सादर करायची असते. त्यानुसार आम्ही अमल महाडिक यांचा अर्ज भरला होता. मात्र सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना खोटी व चुकीची माहिती दिली आहे. शिवाय त्यांनी काही माहिती दडवली आहे. स्वत:ची प्रॉपर्टी लपवली आहे. कसबा बावडा येथील पाच गुंठे जमीन त्यांच्या नावावर आहे. त्यासंबंधीची माहिती लपवली आहे. या कारणावरुन त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला जाऊ शकतो. तसेच त्यांनी शपथपत्रात ताराराणी चौक परिसरातील २३ हजार ६३९ चौरस फूट आहे असे म्हटले आहे. त्यामध्ये चार हिस्से आहेत. ही संपूर्ण दोन लाख १५ हजार ९५३ चौरस फूट आहे. चौथी हिस्सा ५३ हजार ९५८ चौरस फूट इतकी आहे.
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
‘पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत:च्या प्रॉपर्टीची माहिती लपवली आहे. शंभर रुपयांच्या अॅफिडेव्हिटवर वाटणीपत्र करुन सरकारचा ५४ लाख रुपयांचा महसूल बुडविला आहे. यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा यासाठी हायकोर्टात दाद मागणार आहोत. राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत’असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.
‘हायकोर्टात दाद मागताना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही पार्टी करावे लागणार आहे. आयुक्तांनी घरफाळासंबंधी कागदपत्रे दिली नाहीत. मात्र आम्ही शांत बसणार नाही. हायकोर्टात दाद मागणार आहोत. त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावं अशी मागणी करणार आहोत. तीन महिन्याच्या आत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. सत्तेचा गैरवापर करुन त्यांनी अनेक घोटाळे केले आहेत.
महाडिक म्हणाले, ‘डी.वाय.पाटील हॉस्पिटल व हॉटेल सयाजीमध्ये त्यांनी मोठया संख्येने मिळकती भाड्याने दिल्या आहेत. मात्र त्यांनी या मिळकती भाडयाने दिले नाहीत असे म्हटले आहे. साधारणपणे दहा ते बारा कोटी रुपयांची घरफाळा थकबाकी आहे. सरकारी महसूल बुडविला आहे. महसूल बुडविला म्हणून त्यांचा अर्ज अवैध ठरु शकतो. कॉसमॉस बँकेकडून कर्ज घेतले आहे. मात्र त्यांनी कर्ज घेतलेली माहिती व त्याच्या विनियोगयाविषयी माहिती दिलेली नाही. ’
पालकमंत्री पाटील यांनी शंभर रुपयांच्या स्टँम्पवर वाटणीपत्र केले आहे. संबंधित कार्यालयाकडून ५४ लाख रुपयांच्या शुल्काविषयी त्यांना पत्र पाठविले आहे. या पाच मुद्यावरुन सतेज पाटील यांचा अर्ज पात्र ठरु शकत नाही.’ पत्रकार परिषदेला माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.
…………..
जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव दिसतोय
महाडिक म्हणाले, ‘शपथपत्राद्वारे खोटी माहिती दिली म्हणून छाननी प्रक्रियेदरम्यान त्यांचा अर्ज अवैध ठरवायला हवा होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी, हे सगळं माझ्या अधिकारात बसत नाही असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव दिसतो.’

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company