satyajit patil sarudkar

गोकुळच्या निवडणुकीत सत्यजित पाटील सरुडकर यांची घरवापसी

कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची नवी समीकरणं जिल्ह्यासमोर येत आहेत. गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी निवडणुकीमधील रंगत वाढत आहे.

मध्ये याआधी सत्यजित पाटील सरुडकर यांनी विरोधी राजर्षि शाहू आघाडीस पाठिंबा दिला आहे त्यानंतर आमदार विनय कोरे यांनीही याच आघाडीला पाठिंबा दिल्याने सरुडकर गटातून प्रतिक्रिया उमटली होती. कोरे गटाकडून पन्हाळ्यातून अमर पाटील तर काँग्रेसकडून शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार विधानसभेला कोरे यांच्यासोबत राहतात. त्यामुळे गोकुळची ताकद मिळाल्यास आपल्या अडचणी वाढतील असे सरुडकर गटाला वाटत होते. त्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरु होती. या आघाडीत राहायचे की नाही याचा फेरविचार करावा असा दबाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सत्यजित पाटील यांच्यावर होता. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी स्वतः पत्रक काढून स्पष्टीकरण देखील दिले होते.

पण आज सत्यजित पाटील यांच्यासह जि.प.बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी आमदार पी.एन.पाटील आणि महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन सत्ताधारी आघाडीसोबत राहत असल्याचा विश्वास दिला.

सत्यजित पाटील यांच्याकडे शाहुवाडी – पन्हाळा तालुक्यातील बरेचसे ठराव आहेत, त्यामुळे शाहू आघाडीला निवडणूकी अगोदरच मोठा झटका बसला आहे.